Pune Leopard: बिबट्याची दहशत, पुण्यातील लोकप्रिय उद्यान बंद, नागरिकांना आवाहन

Last Updated:

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील प्रसिद्ध उद्यान बिबट्याच्या दहशतीमुळे तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

Pune Leopard: बिबट्याची दहशत, पुण्यातील लोकप्रिय उद्यान बंद, नागरिकांना आवाहन
Pune Leopard: बिबट्याची दहशत, पुण्यातील लोकप्रिय उद्यान बंद, नागरिकांना आवाहन
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी परिसरात बिबट्या आढळल्याची घटना समोर आली आहे. दुर्गा टेकडी परिसर तसेच एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेत काल, म्हणजेच 9 जानेवारीला बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या उद्यान विभागासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित परिसराची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून दुर्गा टेकडी परिसरात नागरिकांचा प्रवेश तात्पुरता बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निगडीतील दुर्गा टेकडी हा परिसर निसर्गसंपन्न असून याठिकाणी दररोज अनेक नागरिक फेरफटका व व्यायामासाठी येत असतात. टेकडीच्या आसपास जलशुद्धीकरण केंद्र तसेच अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीचा संरक्षित भाग आहे. हा संपूर्ण परिसर घनदाट झाडे-झुडपे आणि जंगलाने वेढलेला आहे.
advertisement
अनेक प्रकारचे प्राणी याठिकाणी आढळतात आणि महत्त्वाचं म्हणजे या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अन्नाच्या शोधात बिबट्या येथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून दुर्गा टेकडी तात्पुरती बंद करण्यात आली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी सांगितले की, आम्ही वनविभागाच्या सतत संपर्कात आहोत. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सूचना व आदेशांचे पालन करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Leopard: बिबट्याची दहशत, पुण्यातील लोकप्रिय उद्यान बंद, नागरिकांना आवाहन
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement