Pune News: त्या दुचाकीस्वाराकडे पाहून आला संशय; अडवून पोलिसांनी तपासली बॅग, उघडताच बसला धक्का
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात सांगवी पोलिसांचे पथक तैनात असताना त्यांना एक दुचाकीस्वार संशयास्पदरीत्या जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या खांद्यावरील बॅगेची झडती घेतली
पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात असताना, पिंपळे सौदागर परिसरातून एका दुचाकीस्वाराकडून १५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सांगवी पोलिसांनी कुंजीर चौकात ही मोठी कारवाई केली.
नेमकी घटना काय?
निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे सध्या ठिकठिकाणी नाकाबंदी आणि संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात सांगवी पोलिसांचे पथक तैनात असताना त्यांना एक दुचाकीस्वार संशयास्पदरीत्या जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या खांद्यावरील बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांना धक्काच बसला. त्या बॅगेत १२ लाख रुपयांची भारतीय चलनातील रोकड आणि २ लाख रुपयांचे परदेशी चलन असे एकूण अंदाजे १५ लाख रुपये आढळून आले.
advertisement
सांगवी पोलिसांनी तातडीने दुचाकीस्वारासह ही रोकड ताब्यात घेतली. प्राथमिक चौकशीत संबंधित तरुणाने आपला 'फॉरेन करन्सी एक्स्चेंज'चा (परकीय चलन विनिमय) व्यवसाय असल्याचे सांगितले आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगण्याबाबत अधिकृत कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची गांभीर्याने दखल घेत परकीय चलन विभाग (FEMA) आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. ही रक्कम नेमकी कोठून आली आणि ती कोठे नेली जात होती, याचा सखोल तपास सुरू आहे. जर कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 9:17 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: त्या दुचाकीस्वाराकडे पाहून आला संशय; अडवून पोलिसांनी तपासली बॅग, उघडताच बसला धक्का









