advertisement

Tilgul Ladoo : कुकरच्या एका शिट्टीत बनवा मऊसूत तिळगूळ लाडू आणि तिळाची वडी

Last Updated:

Tilgul Ladoo Recipe Video : कुकरमध्ये सामान्यपणे आपण भात, डाळ, भाजी बनवतो. पण तुम्ही कधी कुकरच्या मदतीने लाडू बनवून पाहिले आहेत का? हे कसं शक्य आहे? असं तुम्ही म्हणाल.

News18
News18
संक्रांत म्हणजे तिळगूळाचे लाडू. पण तिळगूळाचे लाडू बनवणं म्हणजे अनेकांना कठीण वाटतं. विशेषत: हे लाडू बनवताना हाताला चटके लागतात. त्यामुळे अनेक जण लाडू घरी बनवावेसे वाटले तरी बनवणं टाळतात. विकत आणूनच खातात. पण आता आम्ही तुम्हाला तिळगूळाचे लाडू बनवण्याची एकदम सोपी ट्रिक दाखवणार आहोत. तेही कुकरच्या मदतीने.
कुकरमध्ये सामान्यपणे आपण भात, डाळ, भाजी बनवतो. पण तुम्ही कधी कुकरच्या मदतीने लाडू बनवून पाहिले आहेत का? हे कसं शक्य आहे? असं तुम्ही म्हणाल. पण कुकरच्या एका शिट्टीत तुम्हाला मऊसूत असे तिळाचे लाडू आणि वडी बनवता येऊ शकते. एका महिलेने हा रेसिपी व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आहे.
advertisement
साहित्य
तिळगुळाच्या लाडूसाठी
एक वाटी तीळ
अर्धी वाटी शेंगदाणे
दीड वाटी गूळ
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
दोन चमचे साजूक तूप
तिळाच्या वडीसाठी
एक वाटी तीळ
एक वाटी शेंगदाणे
दोन वाट्या गूळ
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
दोन चमचे साजूक तूप
आवडीप्रमाणे सुकामेवा चे काप
कृती
कुकरमध्ये राहतील अशी 2 भांडी घ्या. एका भांड्यात 2 वाट्या आणि एका भांड्यात दीड वाट्या किसलेला गूळ घ्या. कुकरमध्ये थोडं पाणी टाका आणि गूळ असलेली दोन्ही भांडी एकावर एक ठेवून वर झाकण ठेवून. कुकरला एक शिट्टी काढा.
advertisement
आता गॅसवर कढई ठेवून त्यात आधी शेंगदाणे नंतर पांढरे तीळ भाजून घ्या. शेंगदाण्याच्या साली काढून घ्या. वर साहित्यामध्ये लाडू आणि वडीसाठी सांगितलेल्या प्रमाणानुसार शेंगदाणे, तीळ वेगवेगळे काढा. मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सर बंद-चालू करून वाटून घ्या.
आता कुकरमधील गूळ काढून घ्या. हा गूळ तुम्हाला विरघळलेला दिसेल. यात साजूक तूप, वेलची, जायफळ पूड टाकून मिक्स करून घ्या. यात शेंगदाणा, तिळाचं मिश्रण टाका मिक्स करून घ्या. ताट किंवा मिठाईचा बॉक्स घेऊन थोडं तेल लावून मिश्रण त्यात पसरवून घ्या, वरून थोडे भाजलेले तीळ आणि ड्रायफ्रुट्सचे काप पसरवून घ्या आणि थंड झाल्या की वड्या कापून घ्या.
advertisement
लाडूसाठी शेंगदाणे जाडसर वाटून घ्या. तीळही निम्मे वाटून घ्या आणि निम्मे तीळ अख्खे ठेवा. आता दुसऱ्या भांड्यातील गूळात वेलची, जायफळ पावडर आणि शेंगदाणे, तिळाचे मिश्रण टाकून लाडू वळून घ्या. गरज असेल तर थोडंसं तूप टाकून घ्या. हाताला तूप लावून लाडू वळून घ्या. मिश्रण गरम नसतं, त्यामुळे लाडू वळताना हातालाच चटके बिलकुल लागत नाही. एरवी नेहमीच्या पद्धतीने हे लाडू बनवले तर शेवटी मिश्रण कडक होऊ लागतं. पण या पद्धतीने मिश्रण शेवटपर्यंत नरम राहतं.
advertisement
Priyas Kitchen या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही या पद्धतीने तिळाचे लाडू करून पाहा आणि कसे झाले आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tilgul Ladoo : कुकरच्या एका शिट्टीत बनवा मऊसूत तिळगूळ लाडू आणि तिळाची वडी
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement