Mumbai News : मुंबईकरांनो रोजची ये-जा असलेला हा पूल बनलाय जीवघेणा; कधीही होऊ शकतो मोठा अपघात

Last Updated:

Mumbai Kings Circle Footbridge : माटुंगा पूर्व-पश्चिम पादचारी पूल जुना आणि धोकादायक आहे. पायऱ्या तुटल्या आहेत, रेलिंग खराब आहे. शाळकरी मुलं आणि वरिष्ठ नागरिक याचा दररोज वापर करतात. रहिवाशांनी दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

Mumbai Kings Circle Footbridge
Mumbai Kings Circle Footbridge
मुंबई : मुंबईत भाऊ दाजी रोड ते माटुंगा पश्चिम किंग्ज सर्कलजवळ जोडणारा पादचारी पूल धोक्यात आहे. हा पूल जुना असून दररोज शाळकरी मुलं, वरिष्ठ नागरिक आणि मोठ्या प्रमाणात पादचारी याचा वापर करतात. मात्र पुलाचे जिने खूप खराब स्थितीत आहेत आणि काही तुटलेले आहेत. काही पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि पूलावर असलेले रेलिंग धोकादायक स्थितीत आहे.
मुंबईतील आणखी एका पुलाची दुरावस्था
राहिवाशांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली पण अद्याप पूलाची दुरुस्ती किंवा नूतनीकरण केले गेलेले नाही. पुलाजवळ कचरा, माती आणि सिमेंटचे ढिगारे देखील जमले आहेत. माटुंगा पूर्वेकडील बाजूस वाळलेली पानं आणि  तिथे वाढवेल्या झाडांमुळे पूल चालण्यासाठी अरुंद होतो. पावसाळ्यात पूल अधिक धोकादायक होतो कारण निसरडा होतो.
मुंबईतील महत्त्वाचा इंटरचेंज धोक्यात
हा पूल माटुंगा पूर्व आणि पश्चिमाला जोडणारा महत्त्वाचा इंटरचेंज आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रहिवाशांना सुरक्षित मार्गाची गरज आहे. नुकतेच पुलाचा मुद्दा समोर आल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अधिकृत उत्तर देण्यात आले आहे. पुलाची पाहणी केली जाईल आणि त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पथक पाठवले जाईल. राहिवाशांनी विनंती केली आहे की पुल कमीत कमी चालण्यायोग्य केला जावा आणि योग्य देखभाल केली जावी. सुरक्षिततेसाठी त्वरित कारवाई आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईकरांनो रोजची ये-जा असलेला हा पूल बनलाय जीवघेणा; कधीही होऊ शकतो मोठा अपघात
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement