Mangal Ast 2025: मंगळ स्वराशीतच होतोय अस्त! मेषसहित या 5 राशीच्या लोकांना अलर्ट राहावं लागणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mangal Ast 2025: काही राशीच्या लोकांना अशुभ-त्रासदायक गोष्टींना सामोरं जाण्याची तयारी ठेवावीच लागणार आहे. कारण ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ, शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी स्वतःच्या वृश्चिक अस्त होणार आहे. मंगळ असो किंवा इतर कोणताही ग्रह अस्त होतो तेव्हा त्याचा अर्थ असा की, तो सूर्याच्या जवळ जात आहे. या स्थितीला त्या ग्रहाची अस्त स्थिती मानलं जातं. ज्यामुळे तो ग्रह काहीसा शक्तिहीन होतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मेष आणि वृश्चिक राशीचा अधिपती असलेला मंगळ हा रक्त, भूमी, भाऊ, धैर्य आणि शौर्य याचा कारक ग्रह मानला जातो. मंगळाची स्थिती बदलते तेव्हा तो मेष राशीपासून मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींवर परिणाम करतो. मंगळ अस्ताच्या जवळ असल्यानं मेष राशीसह पाच राशींवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मंगळाच्या अस्ताचा कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होईल ते जाणून घेऊया.
advertisement
मंगळाच्या अस्ताचा मेष राशीवर परिणाम -मंगळाच्या अस्तामुळे, मेष राशीच्या लोकांनी अनेक बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणाशीही आर्थिक व्यवहार टाळा, नुकसान होऊ शकते. काळजीपूर्वक वाहन चालवा, कारण दुखापत होण्याचा धोका आहे. मेष राशीच्या लोकांना स्पर्धात्मक परिस्थितीत थोडे अस्वस्थ वाटू शकते आणि आत्मविश्वास कमी होईल. याव्यतिरिक्त, काही प्रतिकूल परिस्थितींमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते.
advertisement
मंगळाच्या अस्ताचा कर्क राशीवर परिणाम -वृश्चिक राशीत मंगळाच्या अस्ताचा कर्क राशीच्या लोकांसाठी मिश्र परिणाम होतील. मंगळाच्या अस्ताचा कर्क राशीच्या लोकांची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, तुमचे कामातील धैर्य कमी होईल. मंगळाच्या अस्तामुळे तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. घरात कोणाच्या ना कोणाच्या तरी बिघडलेल्या आरोग्यामुळे खर्च वाढू शकतो.
advertisement
मंगळाच्या अस्ताचा सिंह राशीवर परिणाम -मंगळाचा भ्रमण सिंह राशीसाठी अस्थिर असेल. मंगळाच्या अस्तामुळे सिंह राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण होऊ शकते. सिंह राशीच्या लोकांनी या काळात प्रवास करणे टाळावे, चोरीचा धोका आहे. प्रेमात असलेल्यांना मंगळाच्या अस्तामुळे विविध अडचणी येऊ शकतात, विश्वासघात होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतात.
advertisement
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांचे यामुळे कामात लक्ष लागणार नाही. कामांमध्ये विलंब होऊ शकतो आणि उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वडील आणि शिक्षकांसोबतच्या संबंधांमध्ये अहंकार वाढू देऊ नका. याव्यतिरिक्त, तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. नोकरी बदलावी लागू शकते किंवा नको त्या ठिकाणी बदली होऊ शकते. जर तुम्हाला या काळात नवीन नोकरी मिळाली तर ती तुमच्या क्षमतेला साजेसी नसेल. व्यावसायात प्रतिस्पर्धी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.
advertisement
धनू राशीच्या लोकांनी या काळात नशिबावर अवलंबून राहू नये तर कठोर परिश्रम करावेत. धनु राशीच्या लोकांनी वैवाहिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे; जोडीदाराशी प्रत्येक विषयावर चर्चा करणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात कोणताही धोका पत्करणे टाळणे चांगले. शक्य तितके कमी बोला, आवश्यक असल्यास विचारपूर्वक बोला. या खबरदारी घेतल्यास तुम्ही मंगळाचे नकारात्मक प्रभाव कमी करू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


