Success Story : अपघातात हात-पाय निकामी, डिप्रेशनवर आलं पण जिद्द नाही सोडली, सुजय यांनी उभी केली 20 कोटींची कंपनी

Last Updated:

इच्छाशक्तीच्या जोरावर व्हीलचेअरवर असलेल्या फक्त बोलता येत असलेल्या सुजय पाचंगे त्यांनी 20 कोटींची कंपनी उभा केली.

+
News18

News18

पुणे : प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द या शब्दांमध्ये जग पालटण्याची ताकद असते. पुण्यातील सुजय पाचंगे यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. सुजय यांचा अवघ्या वयाच्या 21 व्या वर्षी अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही हात आणि पाय निकामी झाले आणि त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. जवळपास 4 ते 5 वर्षे सुजय यांनी डिप्रेशनचा सामना केला. मात्र आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीने त्यांना हार मानू दिली नाही. इच्छाशक्तीच्या जोरावर व्हीलचेअरवर असलेल्या, फक्त बोलता येत असलेल्या सुजय पाचंगे यांनी 20 कोटींची कंपनी उभी केली. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली.
सुजय पाचंगे यांनी सांगितले की, त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना, 25 फेब्रुवारी 2009 रोजी त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचे दोन्ही हात आणि पाय पूर्णपणे निकामी झाले. चार वर्षे ते फक्त बेडवर राहावे लागले. फक्त बोलू शकत होते. अजूनही त्यांना हातापायाची हालचाल करता येत नाही. या काळात त्यांना सुरुवातीला काय करावे हे कळत नव्हते आणि मानसिक संघर्षही मोठ्या प्रमाणात करावा लागला. परंतु त्यांच्या आई-वडिल आणि चुलत बहिणीच्या सततच्या पाठिंब्यामुळे त्यांनी डिप्रेशनवर मात केली आणि जीवनात पुढे जाण्याचा निर्धार केला.
advertisement
व्हीलचेअरवर‌ असतानाही उभी केली 20 कोटींची कंपनी
अपघातानंतर सुजय पाचंगे यांनी 2014 मध्ये आपल्या बहिणीच्या मदतीने छोटा प्री-प्रायमरी स्कूल सुरू केला. काही अडचणीमुळे त्या कामातून त्यांना ब्रेक घ्यावा लागला. काही कालावधीनंतर त्यांनी 2016 साली त्यांनी वरद ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना केली. या कंपनीत मॅनपॉवर सर्विसेस सुरू करण्यात आल्या, ज्या कंपन्यांना कामगारांची गरज असते, त्यांना आवश्यक माणसं पुरवतात. आज ही कंपनी अनेक कंपन्यांसाठी कामगार पुरवण्याचे विश्वासार्ह माध्यम बनली आहे आणि कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 20 कोटींपर्यंत पोहोचला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : अपघातात हात-पाय निकामी, डिप्रेशनवर आलं पण जिद्द नाही सोडली, सुजय यांनी उभी केली 20 कोटींची कंपनी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement