वार्षिक सर्वसाधारण सभा कधीपर्यंत घेणे बंधनकारक असते?
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेपर्यंत बोलवावी. काही कारणांमुळे मुदतवाढ घ्यायची असल्यास नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करून १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ घेता येते. १४ ऑगष्टपर्यंत मुदतवाढ न घेता व १४ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ घेवून सध्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नसेल तर नोंदणी अधिकारी प्राधिकृत अधिकारी नेमून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची कारवाई करू शकतात.
advertisement
सभेमध्ये कोणते विषय घ्यावे लागतात?
कायद्यानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये काही ठराविक विषय अनिवार्यपणे मांडणे आवश्यक आहे. त्यामध्ये मागील वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल (Audit Report), उत्पन्न-खर्च पत्रक, ताळेबंद (Balance Sheet), पुढील वर्षाचा अंदाजपत्रक, देखभाल शुल्काचा आढावा, निवडणुका (जर कालावधी संपत असेल तर) आणि इतर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय यांचा समावेश होतो.सभाशिवाय हे निर्णय कायदेशीर मानले जात नाहीत.
सभासदांचे अधिकार काय?
सभा वेळेत न घेतल्यास सभासद गप्प बसण्यास बांधील नाहीत. कायद्यानुसार, सभासद लेखी मागणी करून AGM घेण्याचा आग्रह धरू शकतात. समिती दुर्लक्ष करत असल्यास निबंधकांकडे थेट तक्रार करता येते.सभेतील आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करण्याचा पूर्ण अधिकार सभासदांना आहे.
