ग्रामपंचायत
जर रस्ता ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असेल, तर तक्रार थेट ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे लेखी स्वरूपात देता येते. ग्रामपंचायत सभेतही ही तक्रार मांडून ठराव घेता येतो. सभेतील ठरावाच्या आधारे पंचायत पुढील पातळीवर प्रस्ताव पाठवू शकते.
पंचायत समिती
गाव जोड रस्ते किंवा मोठ्या अंतर्गत रस्त्यांबाबतची तक्रार संबंधित गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे करावी. अशा रस्त्यांची कामे ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर केल्यास तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असते.
advertisement
जिल्हा परिषद
जर रस्ता "प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)" किंवा "जिल्हा परिषद निधी" मधून झाला असेल, तर तक्रार जिल्हा परिषद अभियंता किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे द्यावी. जिल्हा परिषद अशा कामांचे नियोजन, देखरेख आणि निधीचे वाटप पाहते.
ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा
आता नागरिकांना घरबसल्या तक्रार करता यावी म्हणून शासनाने ऑनलाइन सुविधा दिली आहे. MahaGov Portal किंवा Aaple Sarkar Portal वर जाऊन रस्त्याबाबत ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. तक्रारीसोबत फोटो किंवा व्हिडिओ जोडल्यास तपासणीस वेग येतो आणि तक्रारीला अधिक गांभीर्याने घेतले जाते.
RTI (माहितीचा अधिकार) अंतर्गत माहिती मिळवा
जर रस्त्याचे काम झाले नाही, निधी मंजूर झाला का, की नाही याची माहिती हवी असेल, तर नागरिक https://rtionline.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावरून ऑनलाइन RTI अर्ज दाखल करू शकतात. संबंधित विभागाला ३० दिवसांच्या आत उत्तर देणे बंधनकारक असते. त्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित होते.
रस्त्याच्या प्रकारानुसार जबाबदार संस्था
गावातील गल्ली / अंतर्गत रस्ते – ग्रामपंचायत
गाव जोड रस्ते (GP ते दुसरे गाव) – पंचायत समिती / जिल्हा परिषद अभियंता
मुख्य जिल्हा रस्ते किंवा राज्य महामार्ग – सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) – जिल्हा परिषद व संबंधित अभियंता
तक्रार लिहिताना काय नमूद करावे?
जसे की, रस्त्याचे नाव, गाव, वार्ड क्रमांक, समस्याखड्डे, चिखल, पावसात वाहतूक बंद, अपघाताचा धोका इत्यादी. तसेच शाळा, रुग्णालय, शेताचा रस्ता बंद होणे. फोटो किंवा व्हिडिओ पुरावे जोडल्यास तक्रारीचे वजन वाढते.