सुषमा अंधारेनी आरोप केलेला नामकर्ण आवारे आता भोंदूबाबा खरातच्या प्रकरणांमध्ये चर्चेत आला आहे. एकीकडे आवारे याने अशोक खरात यांच्याशी कुठलेही संबंध नसल्याचं म्हणत असले तरी दुसरीकडे मात्र नामकर्ण आवारे आरोपी खरातचा निकटवर्तीय असल्याचं त्याच्याच आत्मचरित्रातून समोर आलं आहे .सुषमा अंधारे यांनी काही फोटो दाखवत प्रत्येक फोटोत दिसणारा नामकर्ण कोण..? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर चर्चेत आलेले नामकर्ण आवारे याचे अशोक खरात समवेत असणारे घनिष्ठ संबंध अधोरेखित झालेत आहेत.
advertisement
कोण आहे नामकर्ण आवारे?
- सिन्नर येथील सहकारी औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आहे.
- जगदंब पतसंस्थेचा देखील तो चेअरमन आहे.
- काही वर्ष खरात देखील या पतसंस्थेचा संचालक होता.
आवारे आणी खरातचे नेमके काय संबध होते?
- नामकर्ण आवारेची आणि खरातची ओळख 1999 साली झाली.
- खरातसोबत अनेक आर्थिक लागेबांधे त्यांचे होते. खरातचे अंत्यत जवळचे संबंध होते.
- 2010 मीरगावच्या शिवनिका संस्थानच्या वतीने ईशान्येश्वराच्या मंदिराच्या बांधकामाच्या अग्रभागी आवारे होते, असे स्वत: खरातने पुस्तकात्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
- नामकर्ण आवारे हा शिवनिका संस्थानच्या सरचिटणीस पदावर देखील होता. तसेच वेगवेगळ्या पदावर देखील त्याची वर्णी लागली आहे.
- खरात हा ब्रह्मांडनायक कसा आहे याचा प्रचार आणि प्रसार आवारेने केले होता. त्यानंतर अनेक राजकरण्यांना खरातकडे आणण्याचे काम आवारे याने केले आहे
आवारेच्या पुस्तकात नेमकं म्हटलंय तरी काय?
विशेष म्हणजे नामकर्ण आवारे याने 2012 साली लिहिलेल्या "असा मी नामकर्ण" या पुस्तकाची प्रस्तावना अशोक खरात याने लिहिली तर नामकर्ण आवारे याने अशोक खरात याला ब्रह्मांडनायक म्हणत तो सिद्धपुरुष असल्याचं त्याच्या पुस्तकात मांडलय. मागील दोन दिवसांपूर्वी नामकर्ण आवारे यांनी माध्यमांना मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत अशोक खरात आणि रूपाली चाकणकर हे मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत पाहुणे म्हणून सिन्नर औद्योगिक वसाहतिला भेट देण्यासाठी आले होते अशी प्रतिक्रिया दिली होती . खरातशी माझा संबध नसल्याचंही म्हटलं होतं.
