नांदेड मधल्या प्रकरणांमध्ये वडिलांनी आणि भावाने सक्षमला (प्रियकर) मारलं, त्यामुळे मुलींनी देखील अशी मागणी केली आहे की, माझ्या वडिलांना आणि भावाला देखील मारून टाका. यामुळे सध्याला या मुलीवरती देखील मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. वडिलांना आणि भावाला मारण्यापेक्षा आंचलला मारून टाका. अशा प्रकारच्या सध्या गोष्टी समाजामध्ये का वाढत चालले आहेत किंवा यावरती काय नेमकी लोकांची मानसिकता होत आहे किंवा ज्या मुली आहेत त्यांची काय मानसिकता आहेत? याविषयी आपण प्राध्यापक अपर्णा अष्टपुत्रे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
advertisement
आजकाल आपल्याला लोकांमध्ये मालकी हक्क दाखवणं, ही गोष्ट मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मुलगी माझी आहे, तर तिच्यावर माझा पूर्ण अधिकार आहे, मी म्हणलं त्याच पद्धतीने तिने सर्व गोष्टी कराव्यात, अशी एक पालकांची भावना असते. सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणात असल्या पाहिजे अशी देखील लोकांची मानसिकता होत आहे. माझ्या मुलीच्या बाबतीतले सर्व निर्णय मी घेईल, अशी देखील एक पालकांची भावना असते. त्यामुळे तुम्ही कुठले चुकीचे पाऊल उचलत तिला शिक्षाही मी देणार असे देखील सध्याला मानसिकता होत चाललेली आहे. तसंच मुलींचे देखील आहे आयुष्य माझं आहे त्यामुळे मला असं हवं तसं मी करणार तसं मी वागणार.
या सर्व गोष्टींमुळे अशा घटना वाढत चाललेल्या आहेत आणि यामध्ये माफ करणं सोडून देणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दोन्ही बाजूने होत नाही आहेत त्यामुळे देखील यालाही सर्व कारणे कारणीभूत आहेत. त्यामुळे मुलगी असो किंवा वडील असो यांनी अशा प्रकरणांमध्ये एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे आहे जेणेकरून या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नियंत्रणात राहतील. आणि समाजाने देखील कुठल्याही गोष्टींवरती आपल्याला वाटेल तशा कमेंट करणं किंवा तसं भाष्य करणं हे योग्य नाही आहे असे देखील तज्ञांनी सांगितला आहे.