TRENDING:

Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....

Last Updated:

Why Shiv Sena Defeat Ambernath Nagar Parishad: अंबरनाथ नगर परिषदेवरील एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला भाजपने जोरदार धक्का दिला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.

advertisement
अंबरनाथ/ठाणे : वेगवेगळ्या कारणांनी गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या ५९ जागांसाठी निवडणूक पार पडली. अंबरनाथ नगर परिषदेवरील एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला भाजपने जोरदार धक्का दिला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. या निकालात अंबरनाथ नगर परिषदेत नवी समीकरणे समोर आली आहे.
अंबरनाथमध्ये शिंदेंच्या २५ वर्षांच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
अंबरनाथमध्ये शिंदेंच्या २५ वर्षांच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
advertisement

शिवसेना शिंदे गट-भाजप युतीत फोडाफोडीचा वाद जो दिल्ली पर्यंत पोहोचला होता त्याची सुरुवात अंबरनाथ येथून झाली होती. याच अंबरनाथ नगरपरिषदेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अंबरनाथ येथून शिवसेनेचे नगरसेवक भाजपाने फोडले होते. ही निवडणूक भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. तब्बल दोन महिने प्रचारा करता मिळाल्यानंतर काल २० डिसेंबरला अंबरनाथ नगरपरिषदे करता मतदान पार पडले. त्यानंतर आज मतमोजणी झाली. जवळपास तासभर उशिराने मतमोजणी सुरू झाली.

advertisement

अंबरनाथमध्ये शिंदे गटाची पकड चांगली असताना देखील त्यांना नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. मात्र, त्यांना नगराध्यक्ष पद राखता आले नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पराभवाचा धक्का का बसला याच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे.

>> अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेनेच्या पराभवाची 10 कारणे

advertisement

१) मतदानाच्या अवघ्या 48 तास आधी अंबरनाथ मध्ये गोळीबार करण्यात आला. याचा फटका थेट नगराध्यक्ष पदाच्या मतांमध्ये बसला.

२) अंबरनाथमध्ये वाळेकर कुटुंबीयांची असलेल्या दहशतीचं भांडवल करत विरोधक भाजपने निवडणूक प्रचार केला.

३) भाजप शिवसेना यांच्या युतीतला वाद म्हणून अंबरनाथमध्ये शिवसेनेला भाजपच्या रूपाने पर्याय मिळाला.

४) शिवसेनेचे अंबरनाथ शहर प्रमुख तसेच माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर त्यांचा मुलगा निखिल वाळेकर यांचा अतिआत्मविश्वास नडला.

advertisement

५) अंबरनाथ मधील व्यापारी संघाने शेवटच्या क्षणी भाजपाला दिलेली साथ टर्निंग पॉईंट ठरली.

६) जर अंबरनाथ मध्ये शिवसेनेनं नगराध्यक्ष पदाकरता वाळेकर कुटुंबीय सोडून इतर चेहरा दिला असता तर अंबरनाथ मध्ये शिवसेनेला नगराध्यक्ष पदाचा गड राखता आला असता

७) प्रचार करता मिळालेला वाढीव वेळ शिवसेनेने चांगला उपयोगी आणला. पण तो फक्त नगरसेवकांच्या पत्त्यावर पडला नगराध्यक्षपदावर मात्र आत्मविश्वास नडला.

advertisement

८) अंबरनाथमध्ये प्रचार करता मिळालेल्या वाढी वेळेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वापर केला. त्यांनी वेळेत अंबरनाथ मध्ये प्रचार सभा घेतल्याने भाजपला नगराध्यक्ष पदाकरता थेट फायदा झाला.

९) शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचारात जोर मारत होते. मात्र, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर आणि वाळेकर कुटुंबीय मात्र प्रचारावर जास्त भर देत नव्हते.

१०) वाळेकर हे नाव अंबरनाथ मध्ये रक्तरंजित गुंडगिरी म्हणून कुप्रसिद्ध आहे. तर याचाच फायदा घेत भाजपने चार्टर्ड अकाउंटंट आणि तरुण उमेदवार दिल्याने त्याचा फायदा भाजपला झाला.

>अंबरनाथ नगर परिषद निकाल...

अंबरनाथ नगरपालिका 59 जागा

> भाजप 14

> शिंदे शिवसेना 27

> ठाकरे गट 00

> अजित पवार गट 4

> काँग्रेस 12

> अपक्ष 2

इतर संबंधित बातमी:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

Ambernath Nagar Parishad Results: शिंदे-चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, अंबरनाथ नगर परिषदेत मोठा उलटफेर, कोणाला किती जागा? वाचा विजयी उमदेवारांची यादी...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल