मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या पुसद मार्गे एक ट्रॅव्हल बस मुंबईच्या दिशेन जात होती.या बसमध्ये अनेक प्रवासी बसले होते. ही बस जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने ट्रॅव्हल्सला समोरासमोर धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही वाहनांचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला होता. महागाव ते पुसद दरम्यान सायंकाळी ही घटना घडली होती.
advertisement
या घटनेची माहिची मिळताच तत्काळ बसमधील नागरीकांना बाहेर काढण्यात आले होते. या अपघातात सध्या तरी कोणतीही जिवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही आहे. पण अपघातात 7 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर सध्या उपचार सूरू आहेत. जखमींमध्ये दोन्ही वाहनातील चालक आणि प्रवासी असे सात जण आहेत. या सात प्रवाशांची नाव अद्याप समोर आली नाही आहेत.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यासोबत या अपघातानंतर महागाव ते पुसद दरम्यान एकच गर्दी जमली होती. तसेच या अपघाताप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या अपघाताने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावरून वाहनं हटवली आहेत.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
