TRENDING:

Kolhapur: शाळेसमोर नळावर पाणी भरताना तरुणाचं वंगाळ कृत्य, कोल्हापूरमधला किळसवाणा VIDEO व्हायरल

Last Updated:

कोल्हापूर शहर म्हटलं की, रांगड्या माणसांचा देश, बिनधास्त आणि खास कोल्हापुरी भाषेमुळे इथलं माणसं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेली तर लगेच ओळखत येतील

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर शहर म्हटलं की, रांगड्या माणसांचा देश, बिनधास्त आणि खास कोल्हापुरी भाषेमुळे इथलं माणसं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेली तर लगेच ओळखत येतील. भाषा तर कोल्हापूरकरांचा हार्ड विषय. पण, आता कोल्हापूरमध्ये एका विकृत तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका शाळेच्या परिसरातला आहे. शाळेसमोर पाणी भरत असताना एका तरुणाने अर्धनग्न होऊन नको ते चाळे केले, या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  कोल्हापुरातील रुईकर कॉलनीसारख्या उच्चभ्रू वस्तीत हा  संतापजनक आणि किळसवाला प्रकार घडला आहे. या तरुणाचे विकृत चाळे हे कारच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

रुईकर कॉलनी परिसरात एका इंटरनॅशनल प्री प्रायमरी आणि प्रायमरी शाळेसमोर पाण्याचा नळ होता. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, हा विकृत तरुण पाणी भरण्यासाठी स्कुटर घेऊन तिथे आला होता. पण पाणी भरण्यात असताना या तरुणाने शाळेच्या परिसरात लज्जास्पद कृत्य करत होता.

advertisement

बरमुडा घातलेला हा तरुण नळासमोर उभा होता. पण काही वेळानंतर त्याने आपला बरमुडा खाली केला आणि नळाच्या दिशेनं तोंड उभं करून राहिला. भर दिवसा त्याचे हा चाळे सुरू होते. आपला हा प्रताप कुणी पाहत नाही, असं त्याला वाटत होतं. पण, बाजूलाच उभ्या असलेल्याा कारच्या डॅश कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांच्या पूजाच्या मागे लागला साप? 3 महिन्यात 7 वेळा केला दंश, जालन्यातील...
सर्व पहा

शाळेच्या परिसरात  दिवसा ढवळ्या असा  प्रकार घडल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ कोल्हापूरमध्ये व्हायरल झाला आहे.   अशा पद्धतीने शाळेच्या परिसरात कृत्य करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई होणे गरजेचं आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: शाळेसमोर नळावर पाणी भरताना तरुणाचं वंगाळ कृत्य, कोल्हापूरमधला किळसवाणा VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल