TRENDING:

Love in Local : तिकिट, पाऊस आणि ती रोजची ट्रेन, दोन स्टेशनचं अंतर आणि प्रेमाचा प्रवास; विक्रम-रियाची अनोखी प्रेम कहाणी

Last Updated:

दोघांचं रोजचं अंतर बोरिवली ते चर्चगेट. विक्रम पोलीस मुख्यालयात जाण्यासाठी तर रिया तिच्या बुटीकसाठी नेहमीची ठरलेली ट्रेन पकडायचे. ज्यामुळे ट्रेनमध्ये कित्येकदा त्यांची नजरानजर झाली, पण संवाद शून्य. अहंकाराची हलकीशी भिंत, “पहिलं कोण बोलेल?” या प्रश्नात अडकलेली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई म्हटलं की जीवाची दगदग, लांबचा प्रवास आणि लोकल ट्रेन आलीच. इथले बरेचशा लोकांचा जास्तीत जास्त वेळ हा प्रवासात जातो. लाखोंच्या गर्दीतही रोजच्या प्रवासात काही चेहरे हळूहळू परिचयाचे होतात. एका ठरावीक वेळची गाडी, तोच डबा, तेच स्टॉप किंवा स्टेशन… आणि तीच न बोललेली नजर.
लव इन लोकल
लव इन लोकल
advertisement

अशाच गर्दीत दोन चेहरे रोज जवळ येऊनही दूर राहिले.

विक्रम पाटील कोल्हापूरचा मुलगा, बोरिवलीत भाड्याच्या घरात राहणारा, मजबूत बांध्याचा मुंबई पोलिसातील उपनिरीक्षक.

आणि रिया कपूर कांदिवलीची रहिवासी, काळा घोडाजवळ छोटासा बुटीक चालवणारी, दिसायला एखाद्या मॉडेलसारखी.

लव इन लोकल

advertisement

दोघांचं रोजचं अंतर बोरिवली ते चर्चगेट. विक्रम पोलीस मुख्यालयात जाण्यासाठी तर रिया तिच्या बुटीकसाठी नेहमीची ठरलेली ट्रेन पकडायचे. ज्यामुळे ट्रेनमध्ये कित्येकदा त्यांची नजरानजर झाली, पण संवाद शून्य. अहंकाराची हलकीशी भिंत, “पहिलं कोण बोलेल?” या प्रश्नात अडकलेली.

मुंबई रोज त्यांना जवळ आणत होती, आणि त्यांची शांतता रोज लांबत होती.

पहिला टप्पा : अबोला

advertisement

8:35 ची फास्ट लोकल.

बोरिवलीतून विक्रम, नीट इस्त्री केलेल्या निळसर-करड्या शर्टमध्ये, खांद्यावर बॅग घेऊन ट्रेन पकडण्यासाठी धावत होता. तर कांदिवलीतून रिया, पेस्टल रंगाच्या शॉर्ट-ड्रेसमध्ये आणि हातात काही कापड्यांचे रोल्स घेऊन नुकतीच ट्रेनमध्ये चढली. तेवढ्यात तिला मागे कोणीतरी धावत असल्याचं लक्षात आलं, तेव्हा तिने मदतीसाठी हात पुढे केला. विक्रम गडबडीत हात धरुन चढला आणि मग दोघांनी एकमेकांना जवळून पाहिलं.

advertisement

लव इन लोकल

पण लगेचच विक्रमनं आपला हात मागे घेतला आणि रियानंही स्वतःला सावरलं आणि दोघं पुन्हा अनोखळी सारखे ट्रेनमध्ये बसले.

रिया मनात विचार करत बसली “कसा आहे यार हा! साधं ‘थॅंक यू’ तरी बोलायचं होतं.”

advertisement

तेव्हा विक्रम मनातच विचार करत होता “ती खूप बोल्ड आणि फॅशनेबल आहे यार, काही बोललो तर वाटेल मी पटवतोय!”

दुसरा टप्पा : अपघात आणि बदल

एका संध्याकाळी चर्चगेटवर रियाला डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरनं धडक दिली आणि ती खाली पडली. या अपघातामुळे रियाचा पाय मुरगळला होता हातालाही जखमी झाली होती. त्यावेळी लोकांची गर्दी जमली, पण संध्याकाळची ट्रेन पकडण्याची गडबड असल्यामुळे कुणी तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही.

तेवढ्यात विक्रम तिथं आला. गर्दीला बाजूला सारत त्यानं रियाला उचललं आणि जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला. “पाय मुरगळला आहे, हाडं मोडलं असावं बहुतेक एक्स-रे करावं लागेल.” तो डॉक्टरांना म्हणाला.

लव इन लोकल

रिया भानावर आली तेव्हा समोर विक्रम उभा होता. त्यानं रियाकडे पाहात विचारलं “"ठीक आहेस?"

रिया हळू आवाजात म्हणाली "थ… थॅंक यू आणि सॉरी तुम्हाल त्रास दिला."

त्यावर विक्रम हसला आणि म्हणाला, "ड्युटी संपली तरी मी माणूसच आहे. आणि… आपण रोजच एकत्र प्रवास करतो ना."

विक्रमच्या त्या “आपण” या शब्दामुळे रियाच्या मनाला उब मिळाली. शरीराला जखम झाली होती, मात्र विक्रमच्या त्या शब्दानं रियाच्या मनावर मात्र औषध लावलं होतं.

तिसरा टप्पा : मिस झालेली ट्रेन

रिया आठवडाभर ट्रेनमध्ये दिसली नाही. विक्रम रोज त्याच कोपऱ्यात उभा राहिला, पण डोळे फक्त दरवाज्याकडे. सातव्या दिवशी ती आली. पायाला सपोर्ट, हातात काठी घेऊन ती हळूहळू पाऊल टाकत होती.

लव इन लोकल

“कशी आहेस?” विक्रमनं विचारलं.

“ठीक. आता ट्रेन मिस नाही करणार,” ती हसली.

“मला तर वाटलं, माझा डबा मिस केला आहेस.” विक्रम म्हणाला

रिया हसली आणि म्हणाला “तुम्हाला ठाऊक होतं मी कुठं असते?”

“हो… जेव्हा तू नसतेस तेव्हा गर्दी कमी वाटते. तेव्हा समजतं.”

त्या दिवसानंतर दोघांमधी लहान-मोठे संभाषण होऊ लागले आणि कालांतराने ते गप्पांमध्ये बदलले.

तेव्हापासून “आज खूप गर्दी आहे,” “कांदिवलीत पावसाचं प्रमाण जास्त आहे” “बुटीक चाललंय का?” “तुझी ड्युटी कशी चाललीय?”

असा सगळा हळूहळू संवाद सुरु झाला.

चौथा टप्पा : किरकोळ वाद, मोठा परिणाम

लव इन लोकल

एका दिवशी सीटवरून रियाचं एका महिलेशी वाद झाला. रियानं विनम्रपणे म्हटलं बॅग वर ठेवा, मी बसते.”

तर त्या महिलेनं उलट सुनावलं “तुला अजिबात शिस्त नाही, मोठ्यांशी कसं वागावं”

विक्रम उभा होता, तो देखील म्हणाला “काकू, सीट बॅगसाठी नसते.”

तेव्हा मात्र काकूंचा पारा आणखी चढला, “पोलिस आहात म्हणून सगळीकडे धाक दाखवणार का आता तुम्ही?”

तेव्हा रिया चिडली म्हणाली, “मला स्वतः हाताळता येतं.” विक्रम गप्प झाला......

त्यानंतर दिवसभर ते दोघं शांत. संध्याकाळी परतताना रियानं म्हटलं, "सॉरी, मी असं बोलायला नको होतं."

विक्रम—“आणि मलाही मध्ये पडायला नको होतं. तुला हाताळू द्यायला हवं होतं.”

दोघं हसले, गर्दीतलं ते हसू दोघांसाठी प्रेमाचं मोठं पूल ठरलं.

पाचवा टप्पा : बुटीकची अडचण

काळा घोड्याच्या बुटीकला नोटीस मिळाली, तीन महिन्यांचं भाडं बाकी आहे.आठ दिवसात न भरल्यास दुकान रिकामं करा.”

त्यानंतर रिया थोडी विचारा हरवलेलीच चालली होती. “सगळं ठीक?” विक्रमनं विचारलं.

“कपडे बनवायला जमतात, अकाउंट नाही,” ती हसली. मग पुढे तिने सगळा प्रकार विक्रमला सांगितला.

लव इन लोकल

दुसऱ्या दिवशी विक्रमनं वकिल मित्राकडे नेलं. त्यानं तांत्रिक चूक दाखवली आणि मालकाकडून वेळ मिळवून दिला. त्यामुळे रिया खुश झाली. त्या संध्याकाळी रियानं बुटीकमध्ये “लोकल लॉयल्टी डे” ठेवला. लोकलने आलेल्या ग्राहकांना सूट. पोस्टरवर लिहिलं—“लोकलचं प्रेम.” त्यामुळे त्या दिवशी विक्री वाढली.

आनंदात रियाने विक्रमला मेसेज केला, “थॅंक यू, पार्टनर!”

विक्रमच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यानंतर त्या दोघांमधील नातं मैत्रीच्या पुढे गेलं. त्याच्यातील मैत्री पाहून रियाच्या आईन रहावलं नाही आणि तिनं रियाला सांगूनच टाकलं. हे बघ रिया “पोलिसची नोकरी धोक्याची असते, बाळा. त्यात तु आणि तो खूप वेगळे आहात. तुमचं भविष्य कसं असेल? मी विचार देखील करु शकत नाही. भविष्यात त्रास होण्यापेक्षा आताच सावर स्वत:ला"

इकडे विक्रमनं देखील आपल्या मनातली भावना आईला फोनवरुन सांगितली. तेव्हा आई म्हणाली, “फॅशनवाली आपल्या घरात मुरेल का?”

विक्रम हसून म्हणाला “पुढच्या वेळी रियाकडून तुझ्यासाठी खास ड्रेस शिवून आणतो.” मुलगा घरी येणार हे ऐकून आईच्या आवाजात प्रेम उतरलं आणि बाकी कसलाच विचार न करता ती म्हणाली "मग ये लवकर!"

सातवा टप्पा : आजाराची रात्र

एका रात्री रियाची आई आजारी पडली. पाऊस, टॅक्सी नाही. रिया घाबरली होती. तेव्हा रात्री सहजच विक्रमनं मेसेज केला, “सगळं ठीक?” तेव्हा

रियानं सांगितलं “आईला इमर्जन्सी आहे. टॅक्सी नाही. बाबही कामासाठी बाहेरगावी गेलेत.”

तेव्हाच दहाव्या मिनिटांला विक्रम तिच्या इमारतीखाली आला. घराचं दार ठोठावलं आणि म्हणाला “चल.”

त्यानं त्या दिवशी हॉस्पिटल, डॉक्टर, औषधं, फॉर्म्स… सगळं काही एकट्यानं धावपळ करत सांभाळतं. तर रिया आपल्या आईजवळ तिची काळजी घ्यायला थांबली होती. विक्रमला अशी धावपळ करताना पाहून रियाला आपलेपणा आणखी जाणवला, त्यानंतर ती जी त्याच्याकडे बघत बसली ती बघतच बसली..... रियासाठी विक्रांत युनिफॉर्मशिवायही आधार होता.

लव इन लोकल

सकाळी आई बरी झाली. तेव्हा रियाच्या जीवात जीव आणि तोंडातून शब्द पुटपुटले.... “तू नसतास तर…” त्या क्षणी रियाच्या मनातलं सगळं स्थिर झालं.

आठवा टप्पा : रंग, पाऊस आणि डिझाईन

रिया बुटीकमध्ये “मुंबईची रोजची धावपळ” या थीमवर कपडे तयार करते. लोकलच्या तिकिटांची प्रिंट, छत्रीचं डिझाईन, दरवाज्यांसारखी कढाई.

सगळ्यात खास नेव्ही-ब्लू जॅकेट, पोलिसांच्या गणवेशावरून प्रेरित. आतल्या अस्तरावर लोकलचा नकाशा.

“हे तुझ्यासाठी नाही, तुझ्यासारख्यांसाठी,” रिया म्हणाली.

विक्रम जॅकेटला स्पर्श करत “आणि तुझ्यासारख्यांसाठी जे शहर सुंदर करतात.”

एका दिवशी बुटीकमध्ये एक क्लायंट मर्यादा ओलांडतो. रिया त्याला बाहेर काढते. त्याच वेळी विक्रम मिठाई घेऊन येतच असतो तेव्हा तो हे पाहातो.

क्लायंट बाहेर येतो. विक्रम आत विक्रमला पाहून रिया शांत होते.

“काय झालं?” विक्रम विचारतो. रिया सगळं सांगते.

विक्रम म्हणतो “तू स्वतः हाताळलंयस. Proud of you. विक्रमचे हे शब्द ऐकताच रियाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

नववा टप्पा : लोकलमधलं जुळली मन

हलका पाऊस. ८:३५ ची फास्ट लोकल.

कांदिवलीतून चढताना रियानं पाहिलं, विक्रम तिच्या जागेवर उभा.

“रिया…” त्यानं हळूच म्हटलं.

“आपली गोष्ट लोकलमधून सुरू झाली. रोजच्या गर्दीत मला जाणवलं की तू असलीस तर शहर हलकं वाटतं.”

त्यानं खिशातून जुनं लोकल तिकीट काढलं. मागे लिहिलं होतं “Will you share the rest of my journey?”

तिकिटाला छोटासा पेंडंट, लोकलच्या डब्यासारखा.

लव इन लोकल

रिया हसली, पण डोळ्यात पाणी होतं. ती हळूच म्हणाली “हो. पण अट आहे, गर्दीत माझ्यासाठी जागा ठेवशील.”

विक्रम हसला आणि म्हणाला “तुझ्यासाठी तर एक डबा रिकामा करेन.” त्यानंतर त्या दोघांना हे कळूच चुकलं की तेच एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहेत.......

दहावा टप्पा : घरच्यांची संमती

विक्रांतला घरच्यांना भेटवण्यासाठी रिया त्याला घरी घेऊन आली. रियाच्या आईसोबतचा प्रसंग तिच्या बाबांना माहित होता. त्यामुळे रियाच्या बाबांना विक्रांत आवडला होता.

लव इन लोकल

रिया चे वडील विक्रांतला म्हणाले तुझ्यासोबत आमची मुलगी सुरक्षित आहे.”

विक्रम पुढे म्हणाला “आणि तुमची मुलगी माझ्यासोबत धैर्यवान आहे.” त्यानंतर खूप आनंदाने ती संध्याकाळ गेली आणि रियाच्या आई-वडिलांनी या नात्याला स्वीकारलं.

हा घडलेला प्रसंग विक्रांतने आईला सांगितला. त्याची आई देखील खुश झाली आणि म्हणाले “फोटो पाठव रे, होणाऱ्या बायकोचा!”

विक्रम हसून म्हणाला “आत्ता पाठवतो, आई.”

अकरावा टप्पा : रोजचं आयुष्य

अखेर घरच्यांच्या संमतीने दोघांचा साखपुडा पार पडला. तो ही अगदी लोकल थीमवर. म्हणजे पत्रिकांपासून सगळं लोकलच्या थीमसारखंच होतं.

आश्चर्य म्हणदे त्या दोघांनी एकमेकांना मोठमोठे वादे किंवा वचनं दिली नाहीत, आयुष्य एकदम साधं सरळ ठेवण्याचा विचार केला.

लव इन लोकल

फक्त रोजच्या गोष्टी ठरवल्या, कटिंग चहा, मिसळपाव, बुटीकचा व्यवसाय, पोलीसांची ड्युटी…

आणि लोकलच्या तिकिटांच्या मागं लिहिलेले छोटेसे मेसेज—

“पावसात भिजू नकोस,” “आईचं औषध आणलं का?” वैगरे वैगरे.....

मुंबईत प्रेम असंच वाढतं.... थोडं थोडं, दररोज.

विक्रम आणि रियाची गोष्ट फिल्मी नव्हती.

ती खरी होती मुंबईसारखी.

गर्दीत एखादं चेहरं आपलं होतं. चुकीचं गैरसमज मोठ्या विश्वासात बदललं.

या कथेतील सर्व पात्रे, घटना, प्रसंग आणि ठिकाणे पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्तीशी, जिवंत किंवा मृत, किंवा कोणत्याही सत्य घटनेशी कोणताही संबंध नाही. जर यात काही साधर्म्य किंवा योगायोग आढळला, तर तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे आणि कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, समुदाय, धर्म किंवा ठिकाणाला दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नाही.

मराठी बातम्या/मराठी कथा/
Love in Local : तिकिट, पाऊस आणि ती रोजची ट्रेन, दोन स्टेशनचं अंतर आणि प्रेमाचा प्रवास; विक्रम-रियाची अनोखी प्रेम कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल