TRENDING:

1 Rupee Note : 1 रुपयाची ही जुनी नोट असेल तर मिळतील 700000, पाहा कसे?

Last Updated:

निश्चितच तुमच्यापैकी काहीजण स्वत:कडील जुन्या नोटा आणि नाणी विकण्याचा प्रयत्न करतील. गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा आणि नाणी खरेदी-विक्रीचा ट्रेंड वाढला आहे.

advertisement
तुमच्यापैकी अनेकांना जुनी नाणी आणि नोटा जमा करण्याचा छंद असेल. अशातच जर तुम्हाला म्हटलं की, दुर्मिळ नाणी आणि नोटांच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता तर? निश्चितच तुमच्यापैकी काहीजण स्वत:कडील जुन्या नोटा आणि नाणी विकण्याचा प्रयत्न करतील. गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा आणि नाणी खरेदी-विक्रीचा ट्रेंड वाढला आहे. अनेकजण ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मद्वारे जुन्या नोटा आणि नाणी विकत आहेत. जुन्या काळातील एक रुपयाची नोट 200 रुपये ते सात लाख रुपयांना ऑनलाईन विकली जात आहे. तुमच्याकडे असलेली एक रुपयाची नोट किती जुनी आणि युनिक आहे यावरून तिचं मूल्य ठरतं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

कॉईन बाजारसारख्या (Coin Bazaar) ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काही लोक त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा आणि नाणी चढ्या किमतीत विकत आहेत. असं म्हटलं जात आहे की, ऑनलाईन लिलावात एक रुपयाच्या जुन्या नोटेला सात लाख रुपयांपर्यंतची किंमत मिळू शकते. भारत सरकारने 29 वर्षांपूर्वी एक रुपयाच्या नोटांची छपाई बंद केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात 2015 मध्ये पुन्हा ती सुरू करण्यात आली. मात्र, तरीही स्वातंत्र्यपूर्व काळातील नोटांना विशेष महत्त्व आणि मागणी आहे.

advertisement

1935 मध्ये छापण्यात आलेली एक रुपयाची दुर्मिळ नोट सध्या चर्चेत आहेत. ती नोट ब्रिटिशकालीन भारतातील आहे. त्यावर तत्कालीन गव्हर्नर जे. डब्ल्यू. केली यांची सही आहे. ही जवळपास 80 वर्षे जुनी नोट ऐतिहासिक महत्त्वामुळे लिलावात सात लाख रुपयांपर्यंत किंमत मिळवू शकते. तुम्हालाही तुमच्याकडे असलेल्या जुन्या नोटा आणि नाणी विकायची असतील तर तुम्ही कॉईन बाजार आणि क्विकरसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील लिलावात सहभागी होऊ शकता.

advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी-विक्रीला अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. त्यामुळे तुम्हीही जुनी नाणी आणि नोटा विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा आरबीआयनं दिलेल्या सूचना नक्की वाचा. ऑनलाईन फसवणूक करणारे लोक सतत ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते रोज नवनवीन मार्ग शोधतात. त्यामुळे कुठलेही व्यवहार करताना सर्व माहिती घेतल्यानंतरच करावेत.

advertisement

आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे काही लोक ऑनलाईन, ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी आरबीआयचं नाव आणि लोगो वापरत आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा बँकेनं दिला आहे.

मराठी बातम्या/मनी/
1 Rupee Note : 1 रुपयाची ही जुनी नोट असेल तर मिळतील 700000, पाहा कसे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल