...तर 52% कर्मचारी नोकरी सोडण्यास तयार
सर्वेक्षणानुसार 52% भारतीय कर्मचारी अशा नोकऱ्या सोडण्यास तयार आहेत. जिथे त्यांना कामाच्या वेळेची लवचिकता (Flexibility) दिली जात नाही. याचा अर्थ कर्मचारी आता फक्त चांगल्या पगाराकडे न पाहता त्यांच्या सोयीप्रमाणे काम करता येईल का? यालाही मोठे महत्त्व देत आहेत.
मॅनेजरशी संबंध आणि नोकरी सोडण्याचा विचार
advertisement
या रिपोर्टमध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. 60% भारतीय कर्मचारी जर त्यांच्या मॅनेजरसोबत चांगले संबंध ठेवू शकत नसतील, तर ते नोकरी सोडण्याचा विचार करतात. सध्या जगभरात कामाच्या ठिकाणी मोठे बदल घडत आहेत. कर्मचारी आता अशाच ठिकाणी काम करू इच्छितात, जिथे त्यांना समान संधी, योग्य वागणूक आणि सकारात्मक वातावरण मिळेल.
शेअर बाजारातील ATM मशीन, आयुष्यभर पैसा छापाल; ११ मार्चआधी खरेदी हा शेअर करा
भारतातही जागतिक ट्रेंडप्रमाणे बदल दिसतोय
रँडस्टॅड वर्कमॉनिटर सर्वेक्षण मागील 22 वर्षांपासून घेतले जात आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव, बदलते सामाजिक मूल्य आणि उद्देशपूर्ण काम यामुळे भारतीय कर्मचाऱ्यांची विचारसरणी मोठ्या प्रमाणात बदलत आहे.
नोकरी बदलण्याचे प्रमाण वाढले
-यंदाच्या सर्वेक्षणानुसार, नवीन नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण 57% वरून 59% पर्यंत वाढले आहे.
-पूर्वी केवळ वेतन सर्वात महत्त्वाचे मानले जात असे. पण आता कर्मचाऱ्यांना कामाची लवचिकता, सकारात्मक कार्यसंस्कृती आणि कौशल्यवृद्धीच्या संधी जास्त महत्त्वाच्या वाटत आहेत.
-नोकरी म्हणजे केवळ पैसे कमावण्याचे साधन नाही!
-सर्वेक्षणानुसार, भारतीय कर्मचारी आता फक्त पगारासाठी काम करण्याऐवजी अशा नोकरीच्या शोधात आहेत, ज्या त्यांच्या जीवनमूल्यांशी सुसंगत असतील.
-नोकरीची सुरक्षितता, मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील समतोल हे घटक अधिक महत्त्वाचे ठरले आहेत.
पगाराचे प्राधान्य आता चौथ्या क्रमांकावर गेली असून, कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी असलेला'आपलेपणा' आणि चांगले वातावरण अधिक महत्त्वाचे झाले आहे.
-सर्वेक्षणानुसार 69% भारतीय कर्मचारी कामाच्या ठिकाणी आपलेपणा (Sense of Belonging) वाटणे गरजेचे मानतात.
-हा जागतिक स्तरावर फक्त 55% इतकाच आहे.
पैसे पाहिजे होते, लावलं भन्नाट डोकं; प्लॅन फसल्यावर पोलिसांनी दिला ‘फ्री कट’
याचा अर्थ भारतीय कर्मचाऱ्यांना समान संधी, उत्तम वातावरण आणि कंपनीच्या मूल्यांशी जुळणारी कार्यसंस्कृती हवी आहे. तसेच सर्वेक्षणात असे आढळले की 67% भारतीय कर्मचारी जर त्यांच्या नोकरीत नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळत नसेल, तर ती नोकरी सोडण्याचा विचार करतात.जागतिक स्तरावर हे प्रमाण फक्त 41% आहे.
AI शिकण्यावर भारतीय कर्मचाऱ्यांचा भर!
कर्मचारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रशिक्षणालाही मोठे महत्त्व देत आहेत. भारतातील 43% कर्मचारी AI ट्रेनिंगला सर्वात महत्त्वाची स्किल डेव्हलपमेंट संधी मानतात, तर जागतिक स्तरावर हा आकडा फक्त 23% आहे.याचा अर्थ भारतीय कर्मचारी नवीन तंत्रज्ञान शिकण्यास अधिक तयार आहेत.
कामाचे तास आणि ठिकाण लवचिक हवे!
-60% कर्मचारी ज्या नोकरीत लवचिक कामाचे तास नसतील, ती नोकरी स्वीकारणार नाहीत.
-56% कर्मचारी ज्या ठिकाणी काम करायचे ठिकाण ठरलेले असेल आणि लवचिकता नसेल, ती नोकरी घेण्यास नकार देतील.
-73% कर्मचारी असे मानतात की, कंपन्यांनी लवचिकता दिल्यास त्यांचा कंपनीवरील विश्वास वाढेल.
शेअर बाजार कोसळत असताना पठ्ठ्याने ३० कोटी छापले, ४५ दिवसांत केला करोडोंचा गेम
भारतीय कंपन्यांसाठी धडा – बदल आवश्यक!
रँडस्टॅड इंडिया चे एमडी आणि सीईओ, विश्वनाथ पीएस म्हणतात, भारतीय कर्मचाऱ्यांच्या पिढ्यांमध्ये आता विशेष फरक राहिलेला नाही. सर्वच कर्मचाऱ्यांना लवचिकता हवी आहे. हे आता अतिरिक्त सुविधा नसून, एक मूलभूत गरज बनली आहे. कंपन्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करणे अत्यावश्यक झाले आहे.
भारतीय कर्मचाऱ्यांचे बदलते प्राधान्यक्रम
-52% कर्मचारी लवचिकता नसेल, तर नोकरी सोडण्यास तयार
-60% कर्मचारी मॅनेजरशी नाते बिघडल्यास नोकरी सोडण्याचा विचार करतील
-67% कर्मचारी शिकण्याची संधी नसेल, तर कंपनी सोडतील
-69% कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये आपलेपणा आणि समानता हवी
-AI प्रशिक्षणाला 43% भारतीय कर्मचाऱ्यांकडून प्राधान्य, तर जागतिक पातळीवर हा आकडा 23%
कंपन्यांसाठी मोठा इशारा
भारतीय कर्मचारी आता नोकरी बदलताना फक्त पगार नाही, तर लवचिकता, शिकण्याच्या संधी आणि समतोल जीवनशैलीला अधिक महत्त्व देत आहेत.