शेअर बाजार कोसळत असताना पठ्ठ्याने ३० कोटी छापले, फक्त ४५ दिवसांत केला करोडोंचा गेम

Last Updated:

Pintu Mahara News: शेअर बाजारात मोठी घसरण सुरू असताना एका तरुणाने अवघ्या ४५ दिवसांत तब्बल ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याने घेतलेला अनोखा व्यावसायिक निर्णय आणि मेहनतीची जोड यामुळे हा आर्थिक गेम changer ठरला.

News18
News18
नवी दिल्ली: प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात सर्वाधिक चर्चेत राहणारा नाविक म्हणजे पिंटू महारा आता पुन्हा एकचा चर्चेत आला आहे. पिंटूने अवघ्या ४५ दिवसांत ३० कोटी रुपयांची कमाई करून त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या नाविकाच्या कमाईचा उल्लेख केला. पिंटू महाराकडे एकूण १३० नाव होत्या आणि दररोज सरासरी २३ लाख रुपये कमावले. मात्र, एवढ्या मोठ्या उत्पन्नावर त्याला किती कर भरावा लागणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
३० कोटींच्या कमाईवर किती कर द्यावा लागेल?
आयकर नियमांनुसार १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर ३०% कर लागू होतो. त्यामुळे नाविक पिंटू महाराच्या ३० कोटींच्या उत्पन्नावर एकूण करदायित्व जवळपास १२ कोटी ८० लाख रुपये एवढे होईल. यामध्ये इनकम टॅक्स ८.९८ कोटी रुपये त्यावर सरचार्ज ३.३२ कोटी रुपये आणि हेल्थ आणि एज्युकेशन सेस ४९.२१ लाख रुपये द्यावे लागतील.
advertisement
pintu mahara, boatman pintu mahara, how pintu mahara earn rs 30 crore, income tax liability on pintu mahara, how much income tax have to pay pintu mahara, pintu mahara news, mahakumbh 2025, पिंटू महारा से जुड़ी खबर, नाविक पिंटू महारा ने कैसे कमाए 30 करोड़, पिंटू महारा को कितना इनकम टैक्स देना होगा, महाकुंभ में नाविक पिंटू महारा
advertisement
मात्र, व्यावसायिक उत्पन्नावर झालेला खर्च वजा करून कर आकारला जातो. जर पिंटू महारा आपल्या खर्चानंतर २० कोटींचे निव्वळ उत्पन्न दाखवले तर त्याला अंदाजे ८.५२ कोटी रुपये कर भरावा लागेल.
पिंटू महाराने एवढी मोठी कमाई कशी केली?
महाकुंभसाठी पिंटू महाराने तब्बल ७० नवीन नाव बांधल्या होत्या. यासाठी त्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि दागिने गहाण ठेवले. त्याच्याकडे एकूण १३० नाव होत्या. ज्याद्वारे त्याने महाकुंभ दरम्यान दररोज सुमारे ५०,००० ते ५२,००० रुपये प्रति नाव कमावले. विशेष म्हणजे या मोठ्या व्यवस्थापनासाठी पिंटूच्या सोबत ३०० पेक्षा जास्त कामगार कार्यरत होते. या प्रचंड कमाईमुळे पिंटू महाराचे नाव सध्या चर्चेत आहे. महाकुंभसाठी होणारी गर्दी आणि त्यातून उत्पन्न कमवण्याची संधी शोधणाऱ्या पिंटूच्या सक्सेस स्टोरीची सध्या देशभरात चर्च सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजार कोसळत असताना पठ्ठ्याने ३० कोटी छापले, फक्त ४५ दिवसांत केला करोडोंचा गेम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement