TRENDING:

Aadhaar Update: आधार कार्ड अपडेट करण्यासाठी हीच शेवटची संधी, सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Last Updated:

आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख UIDAI ने 14 जून 2026 पर्यंत वाढवली आहे. myAadhaar पोर्टलवर जाऊन नागरिक मोफत ऑनलाइन माहिती सुधारू शकतात.

advertisement
मुंबई: आधार कार्ड फक्त ओळखपत्रच नाही तर आज प्रत्येक ठिकाणी आवश्यक डॉक्युमेंट म्हणून वापरलं जातं. कोणतंही काम आधार नंबरशिवाय पूर्ण होतच नाही. अनेक सरकारी आणि खासगी व्यवहारांसाठी आधार कार्डची प्रत अनिवार्य केली जाते. बँकेत खातं उघडायचं असो, सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, की मोबाइल सिम घ्यायचं असो, आधारशिवाय पुढची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे आधारमध्ये असलेली माहिती अचूक असणं ही फक्त गरज नाही, तर जबाबदारी आहे.
आधार कार्ड
आधार कार्ड
advertisement

सरकारच्या नियमानुसार 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. 10 वर्षांनी बायोमॅट्रिकपासून संपूर्ण आधार कार्ड अपडेट करायला हवं. तुम्ही जर अजूनही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. यानंतर मात्र आधार कार्ड अपडेट करण्याची कोणतीही मुदत वाढणार नाही.

अनेक वेळा आपण घर बदलतो, नावात बदल होतो, किंवा जन्मतारीखच्या नोंदीत चूक राहते आणि ही चूक आधारमध्येही तशीच राहते. अशा वेळी त्या चुकीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. सरकारी फायदे, विमा, शिक्षण, रोजगार यांसारख्या अनेक क्षेत्रात आधारातील चुकांमुळे अडथळे येऊ शकतात.

advertisement

Aadhaar Card Update: तुमच्या आधार कार्डवरची सर्वात मोठी बातमी, नोव्हेंबरपासून नवा नियम; सरकारचं 2024 मधील ‘डिजिटल गिफ्ट’

यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधार अपडेट करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्याची अंतिम तारीख आधी 14 जून 2025 होती. मात्र, तीच UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर करताना सांगितलं की, 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.या निर्णयामुळे कोट्यवधी आधारधारकांना अजून एक वर्ष मिळालं आहे ज्या कालावधीत ते मोफत कागदपत्रे अपलोड करून आपली माहिती सुधारू शकतात.

advertisement

UIDAI च्या myAadhaar पोर्टलवर जाऊन, लॉगिन करून, Update Aadhaar Online पर्याय निवडायचा आहे. तिथे तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख यासारखी माहिती फ्रीमध्ये अपडेट करू शकता. त्यासाठी आधार क्रमांक आणि ओटीपीची गरज आहे. काही बाबतींत संबंधित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात.

advertisement

Aadhaar Card होतंय स्मार्ट! आता फोटोकॉपी करण्याची गरज नाही, काम होणार सोपं

ही सेवा सध्या फक्त ऑनलाइन अपडेटसाठी मोफत आहे. जर तुम्ही केंद्रावर जाऊन सुधारणा करत असाल, तर त्यासाठी शुल्क आकारले जाईल. त्यामुळे तुमचं नाव, पत्ता, किंवा इतर माहिती चुकीची असेल, तर आजच online माध्यमातून ती मोफत अपडेट करा.

मराठी बातम्या/मनी/
Aadhaar Update: आधार कार्ड अपडेट करण्यासाठी हीच शेवटची संधी, सरकारने दिली महत्त्वाची अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल