भंडारा: पारंपारिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. सध्याच्या काळात शाश्वत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादनांकडे शेतकरी वळताना दिसतायेत. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात पारंपरिक धान शेती केली जाते. पण किटाडी येथील शेतकरी लेकराम चौधरी यांनी पारंपरिक धान शेतीला फाटा देत मिरचीची लागवड केली. सव्वा एकर मिरचीच्या शेतीतून त्यांना 8 लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळेच तिखट मिरचीने आता लेकराम यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे.
advertisement
लाल मिरचीने दिला बेरोजगारांना आधार; हजारो महिला-पुरुषांची रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली Video
धानाच्या पट्ट्यात पिकवली मिरची
भंडारा जिल्ह्यातील किटाडी येथील लेकराम चौधरी या शेतकऱ्याने कमी पाणी आणि कमी खर्चात मिरचीच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. किटाडी येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या पारंपरिक धानाची शेती करतात. मात्र, या शेतीतून हवा तेवढा नफा मिळत नाही. हे वास्तव शेतकऱ्यांनी अनुभवलं. त्यात अनेकदा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याला पर्याय म्हणून कमी पाण्याची व कमी खर्चाच्या शेतीसाठी लेकराम यांनी मिरचीच्या शेतीचा वेगळा पर्याय शोधला.
सरकारी योजनेतून घेतलं कर्ज अन् सुरू केला व्यवसाय, महिलेची महिन्याला 50 हजारांची कमाई, Video
वर्षाला सात ते आठ लाखांचं उत्पन्न
लेकराम यांनी सव्वा एकर जागेत मिरचीची लागवड केली. मिरची शेतीतून त्यांना चांगले उत्पादन झाले. तसेच तब्बल 8 लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय. लेकराम यांचा धानाच्या पट्ट्यात मिरची शेतीतील यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे अपयशाने किंवा नुकसान झाल्याने खचून न जाता नव्याने योग्य पर्याय निवडून केलेली मेहनत नक्कीच फळाला येते हेच यातून सिद्ध होतंय.