advertisement

सरकारी योजनेतून घेतलं कर्ज अन् सुरू केला व्यवसाय, महिलेची महिन्याला 50 हजारांची कमाई, Video

Last Updated:

पदवीचं शिक्षण घेतलेल्या स्वाती यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घेत 'स्वरा मिल्क युनिट' सुरू केलं. आता त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे.

+
सरकारी

सरकारी योजनेतून घेतलं कर्ज अन् सुरू केला दुग्ध व्यवसाय, महिलेची महिन्याला 50 हजारांची कमाई, Video

अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारडून विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना होय. याच योजनेचा लाभ घेत वर्धा जिल्ह्यातील महिला शेतकरी महिन्याला 50 हजारांची कमाई करत आहे. स्वाती दुर्णे या आर्वी येथील टोना गावच्या रहिवासी असून त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पदवीचं शिक्षण घेतलेल्या स्वाती यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घेत 'स्वरा मिल्क युनिट' सुरू केलं. आता त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे.
advertisement
पारंपारिक शेतीच्या व्यवसायाला जोडधंदा
स्वाती यांच्या कडे परंपरागत 10 एकर शेती आहे. सुरवातीपासून त्यांचं कुटुंब शेती करत होतं. परंतु, अतिवृष्टी व निसर्गाचा लहरीपणा यामुळे काहीतरी जोडधंदा सुरू करण्याचं ठरवलं. त्यांच्याकडे आधी ४ गायी होत्या. गावातच मदर डेरी असल्याने त्यांचा प्रवास खर्च वाचत होता. त्यांनी हा व्यवसाय वाढविण्याचा विचार केला. स्वाती दुर्णे यांना पंचायत समितीत पंतप्रधान मुद्रा योजने संदर्भात माहिती मिळाली. त्यांनी वर्धा जिल्ह्याच्या आर्वी इथल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या बँक व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करत पंतप्रधान मुद्रा योजने संदर्भात माहिती घेतली. काही दिवसातच स्वाती यांनी कर्जासाठी सर्व कागदपत्रे विदर्भ कोकण बँकेकडे दिली.
advertisement
गायींमुळे वाढला व्यवसाय
स्वाती यांना 8 ते 10 दिवसांतच पंतप्रधान मुद्रा योजनेचा 1 लाख 90 हजार रुपयांचा लाभ मिळाला. त्यांनी लगेच या रकमेतून 4 गायी व एक दूध काढण्याचं यंत्र विकत घेतलं. आता त्यांच्याकडे 8 गायी झाल्या आहेत. पूर्वी 4 गाईंचं 20 ते 30 लिटर दूध निघत होते. आता गाईंच्या संख्येत वाढ झाल्याने 60 ते 65 लिटर दूध रोज गावातील मदर डेयरीला जाते. यातून महिन्याला 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्यात गायींचा, चारा, पाणी, लसीकरण आदी खर्च वजा जाता 20-25 हजार रुपये फायदा होत आहे, असे स्वाती सांगतात.
advertisement
काय सांगतात स्वाती दुर्णे?
"माझ्या शेतीला उपयुक्त असा जोडधंदा म्हणून मी गोपालून सुरू केल. केंद्र सरकारने दिलेल्या या पंतप्रधान मुद्रा योजनेमुळे मी आज यशस्वी झाली आहे. केंद्र सरकारचे मी आभार मानते. असाच लाभ आमच्या सारख्या महिलांना मिळाला तर छोट्या व मध्यम वर्गातील महिला मोठी भरारी घेऊ शकतात. असे मला तरी वाटते. त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानते," असे स्वाती दुर्णे सांगतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
सरकारी योजनेतून घेतलं कर्ज अन् सुरू केला व्यवसाय, महिलेची महिन्याला 50 हजारांची कमाई, Video
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement