शिक्षण सुखकर करणारी शाळा; परसबाग निर्मितीतून विद्यार्थी घेताहेत धडे Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शिक्षिकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी उभारलेली परसबाग इतरांना प्रेरणादायी आहे. यामुळे विद्यार्थिनींत देखील आहाराविषयी जागृती होत आहे.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : आजच्या काळात विद्यार्थ्यांचं शिक्षण सुखकर करण्याची गरज आहे. त्याचा एक प्रयत्न म्हणजे परसबाग. परसबागेतून विद्यार्थ्यांना विविध विषयाचे ज्ञान मिळत असते. त्यामुळे वर्ध्यातील गिरड येथील कन्या शाळेच्या परसबागेच्या निर्मितीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अनोखा आनंद मिळतोय. सर्वत्र पोषण आहाराविषयी बोलल्या जातं मात्र कृतीतून नैसर्गिक परसबाग उभ्या होतांना दिसत नाही. मात्र वर्ध्येतील गिरडच्या कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी श्रमदानातून शाळा परिसरात विषमुक्त परसबागेचे नंदनवन फुलविले आहे. शिक्षिकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी उभारलेली परसबाग इतरांना प्रेरणादायी आहे. यामुळे विद्यार्थिनींत देखील आहाराविषयी जागृती होत आहे.
advertisement
यासाठी परसबाग निर्मिती
वर्ध्यातील गिरड शाळेत फुलवलेल्या या परसबागेची निर्मिती शाळेतील सर्व शिक्षक मंडळी आणि विद्यार्थिनी तसेच इतरांनी मिळून केली आहे. मुलांना भौमितिक आकाराची माहिती मिळावी कल्पना यावी तसेच व्यावसायिक व्यवहारिक ज्ञान त्यांना मिळावं आणि नेमकी भाजीपाल्याची लागवड कशी होते हे त्यांना जवळून कळावं यासाठी परसबाग निर्मिती करण्यात आली आहे. परसबागेमध्ये फुल कोबी, टोमॅटो, कांदा, पालक, मेथी, इतकच नाहीतर हळदीची सुद्धा लागवड करण्यात आली आहे. या बियाण्यांची रोपे आणि शुद्ध आणि चांगल्या प्रतीची बियाणं मगन संग्रहालय समितीच्या वतीने आम्हाला देण्यात आली. त्यामुळे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे मुख्याध्यापिका माया चाफले यांनी सांगितले.
advertisement
वर्ध्यातील मगन संग्रहालय समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने फरीदपूर गावात घर तिथे परसबाग उपक्रमात राबविला जात आहे. तर गिरड परिसरातील 11 गावातील शाळेत मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग निर्मिती करून देशी बियाण्यासह कोबी, टमाटर, वांगी, पालक, मेथी, कांदा, लसूण, हळद, इत्यादी पालेभाज्यांचे रोप पूरविली आहे. यातून गावागावात पोषण आहाराविषयी जागृती केली जात आहे.
advertisement
बागेच्या आकारातुन गणिताचे शिक्षण
शाळेतील शिक्षिकांनी शालेय सुट्टीच्या वेळात परिसर स्वच्छतेसोबत पर्यावरण शिक्षण आणि गणिती परिभाषेत अभ्यासाक्रम विद्यार्थिनीत रुजविण्यासाठी परसबागेची निर्मिती केली आहे. परसबाग निर्मिती करतांना षटकोण, चौरस, गोलाकार, त्रिकोण, वर्तुकार आकृत्याच्या आकाराचे वाफे तयार करून भाजीपाला लागवड केली आहे. यातून सेंद्रिय शेतीचा संदेश दिला जात आहे.
advertisement
पोषण आहारामध्ये याच भाज्या
मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी असून मी शाळेमध्ये परसबाग फुलवली आहे. आमच्या शाळेतल्या रिकाम्या जागेमध्ये आम्ही ही परसबाग पुरविली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फुलांची ही झाडे आम्ही लावली असून आमच्या पोषण आहारामध्ये याच भाज्या आम्ही वापरत असून खात असतो, आस्था चुटे या विद्यार्थिनीने सांगितले.
advertisement
परसबाग पूर्णतः नैसर्गिक
महिलांचा हिमोग्लोबिन वाढवं आणि पोषण आहार कुटुंबाला मिळावं. यासाठी मगन संग्रहालयाने 11 शाळा आणि फरीदपूर, शिवणफळ, यासारखे काही गाव दत्तक घेऊन हा उपक्रम राबविलाय. आणि ही परसबाग पूर्णतः नैसर्गिक आहे, असे गिरड येथील मगन संग्रहालय समितीचे कार्यकर्ते विष्णू ब्राम्हणवाडे यांनी सांगितले.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
February 16, 2024 10:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
शिक्षण सुखकर करणारी शाळा; परसबाग निर्मितीतून विद्यार्थी घेताहेत धडे Video