कोल्हापूरचा विनायक देणार साहेबांना सल्ला, ब्रिटिश सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोल्हापूरचे सुपुत्र असलेले युवा संशोधक विनायक हेगाणा यांची ब्रिटिश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीत जगभरात नावलौकीक मिळवलेल्या कित्येक व्यक्ती घडल्या आहेत. या यादीत आता अजून एका व्यक्तीचे नाव जोडले गेले आहे. कोल्हापूरचे सुपुत्र असलेल्या युवा संशोधकाची थेट युनायटेड किंगडम ब्रिटिश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्राच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
advertisement
युवा कृषी धोरणकर्ता
विनायक हेगाणा हे कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड गावचे सुपुत्र असून त्यांची एक युवा कृषी धोरणकर्ता, संशोधक, लेखक व शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या पिरॅमिड मॉडेलचे जनक अशी ओळख आहे. शेतकरी आत्महत्या प्रश्नाकडे बघण्याचा सर्वसमावेशकपणे दृष्टिकोन त्यांनी त्यांच्या 'शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध' या पुस्तकातून मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता, शेतकरी, युवापिढी, प्रशासकीय अधिकारी यांना मार्गदर्शक ठरत आहे.
advertisement
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काम
विनायक यांनी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तर मागच्या 9 वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाड्यात त्यांनी अविरतपणे काम केले. तसेच जिल्हास्तरावर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत देखील ते सहभागी होते. शिवार संसद, युवा चळवळ उभी करून त्यांनी शेतकरी कुटुंबातील युवकांना एकत्र केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुर्णपणे रोखण्यासाठी “शिवार हेल्पलाइन” या संशोधनपर संकल्पनेतून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात त्यांना यश आले.
advertisement
ग्लोबल चेंजमेकर विनायक
विनायक यांच्या आजवरच्या कार्याची राज्य राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर देखील दखल घेण्यात आली आहे. जागतिक पातळीवरील विकासात योगदान दिल्यामुळे विनायक यांचा ग्लोबल चेंजमेकर फेलोशिपही देवून गौरवही करण्यात आला आहे. ब्रिटिश सरकारच्या ‘चेव्हनिग ग्लोबल लीडर’ या पुरस्काराने देखील काही महिन्यांपूर्वीच हेगाणा यांना सन्मानित करण्यात आले होते. तर आता त्यांची निवड थेट ब्रिटिश सरकारच्या मंत्रालयात करण्यात आली आहे. युनायटेड किंग्डमच्या आरोग्य आणि ग्रामीण मंत्रालयात विशेष सल्लागार म्हणून ते कार्य करणार आहेत.
advertisement
काय असेल विनायक यांचे काम?
या नियुक्तीमुळे विनायक यांच्यावरील जबाबदारीत वाढ झाली आहे. स्वान्सी विद्यापीठाच्या संशोधक व संचालक डॉ. इमा फारसन या सल्लागार गटाचे नेतृत्व करत आहेत. युकेमधील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी धोरण निर्मिती व सल्ला या महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी आता विनायक पार पाडणार आहेत.
advertisement
दरम्यान, परदेशात संशोधन आणि शिक्षणासाठी गेलेल्या विनायक हेगाणे यांची नाळ आपल्या मायभूमीशी जोडलेलीच आहे. त्यामुळेच पुढे भारतात परत येऊन देशातील शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याचा मानस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
February 15, 2024 6:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरचा विनायक देणार साहेबांना सल्ला, ब्रिटिश सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, Video