advertisement

घाणेरडं गाणं, अश्लील कोरिओग्राफी; डबल मिनिंग गाणं आंगलट येताच गीतकाराने जोडले हात, सांगितलं कोणाचा दबाव होता

Last Updated:
Nora Fatehi Song Controversy: ३० एप्रिलला रिलीज होणाऱ्या केडी : द डेव्हिल या चित्रपटातील 'सरके चुनर तेरी' या गाण्यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे.
1/7
मुंबई : कन्नड सिनेसृष्टीने आपल्याला 'कांतारा', 'केजीएफ', 'चार्ली ७७७' यांसारखे अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. पण सध्या या सिनेसृष्टीतील एका सिनेमामुळे गदारोळ झाला आहे. ३० एप्रिलला रिलीज होणाऱ्या केडी : द डेव्हिल या चित्रपटातील 'सरके चुनर तेरी' या गाण्यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे.

2/7
नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्या 'सरके चुनर तेरी' या गाण्यातील अश्लील बोलांमुळे सध्या संतप्त वातावरण पाहायला मिळतंय. याचाच परिणाम म्हणून गाणं रिलीज होताच केवळ ४८ तासांतच हे गाणं युट्यूबवरून काढून टाकण्यात आलं आहे. अशातच या गाण्याच्या गीतकाराने नुकतंच अतिशय खळबळजनक खुलासा केला आहे.

3/7
गाण्यामुळे वाद सुरू होताच, या गाण्याच्या गीतकाराचं नाव समोर आलं. हे गीतकार आहेत रकीब आलम. 'पुष्पा: द राईज' मधील 'श्रीवल्ली' आणि 'ऊ बोलेगा या ऊ ऊ बोलेगा' सारखी सुपरहिट गाणी त्यांनीच लिहिली आहेत.

4/7
अशातच ए.आर. रहमान आणि देवी श्री प्रसाद यांच्यासोबत काम करणाऱ्या या दिग्गज लेखकाने इतकी वाईट गाणी कशी लिहिली? असा प्रश्न विचारला जात होता. आता रकीब यांनी स्वतः समोर येत दिग्दर्शक प्रेम यांची पोलखोल केली आहे.

5/7
दरम्यान, नुकतंच NDTV शी बोलताना रकीब आलम यांनी या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले,
दरम्यान, नुकतंच NDTV शी बोलताना रकीब आलम यांनी या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, "मी हे गाणं लिहिलं नाहीये, तर ते फक्त ट्रान्सलेट केलंय. मी दिग्दर्शक प्रेम यांना हजार वेळा हात जोडून विनंती केली होती की, हे शब्द हिंदीत अजिबात चालणार नाहीत, ते बदलायला हवेत. पण दिग्दर्शक ऐकायला तयारच नव्हते. मूळ कन्नड गाण्यातील शब्दांचं जशास तसं हिंदी भाषांतर करण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला."
advertisement
6/7
त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांनी दिग्दर्शकाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, अशा प्रकारचे शब्द सेंसर बोर्ड कधीच पास करणार नाही. पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं.
त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांनी दिग्दर्शकाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, अशा प्रकारचे शब्द सेंसर बोर्ड कधीच पास करणार नाही. पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. "प्रेम यांनी मला खात्री दिली होती की ते सगळं सांभाळून घेतील. मला आता वाटतंय की त्यांनी कदाचित चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी जाणूनबुजून हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असावा," असा खळबळजनक आरोप रकीब यांनी केला आहे.
advertisement
7/7
क्रेडिट्समध्ये आपलं नाव पाहून रकीब यांना धक्का बसला आहे. केवळ एका अनुवादकाचं काम करूनही त्यांच्या नावावर हे अश्लील गाणं खपवण्यात आल्याने ते प्रचंड चिडले आहेत.
क्रेडिट्समध्ये आपलं नाव पाहून रकीब यांना धक्का बसला आहे. केवळ एका अनुवादकाचं काम करूनही त्यांच्या नावावर हे अश्लील गाणं खपवण्यात आल्याने ते प्रचंड चिडले आहेत.
advertisement
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement