प्रवाशांना मोठा दिलासा, उन्हाळ्यात मुंबईतून धावणार विशेष रेल्वे गाड्या, कोणते असतील थांबे?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुंबईसह प्रमुख स्थानकांहून देशातील विविध शहरांकडे या गाड्या धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेकडून उन्हाळ्यातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईसह प्रमुख स्थानकांहून देशातील विविध शहरांकडे या गाड्या धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गोरखपूरसाठी दैनिक विशेष गाड्या 01079 आणि 01080 चालतील. या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झाशी, कानपूर, लखनौ, गोंडा आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील. तसेच CSMT–मडगाव साप्ताहिक गाड्या 01171 आणि 01172 या कोकण मार्गावर धावतील. त्यांना पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी येथे थांबे दिले आहेत.
advertisement
नागपूरसाठी द्विसाप्ताहिक विशेष गाड्या 02141 आणि 02142 चालवण्यात येणार असून त्या नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या स्थानकांवर थांबतील. दादरहून बलियासाठी 01025 व 01026 या गाड्या हरदा, इटारसी, छतरपूर, खजुराहो, प्रयागराज, वाराणसी मार्गे धावतील.
advertisement
दादर–गोरखपूर विशेष गाड्या 01027 आणि 01028 या आठवड्यातून चार वेळा धावणार असून त्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अनेक स्थानकांवर थांबतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून समस्तीपूरसाठी 01043 आणि 01044 या गाड्या चालतील. त्यांना इगतपुरी, जळगाव, जबलपूर, सतना, पाटलीपुत्र, हाजीपूर येथे थांबे आहेत. बनारस मार्गासाठी 01073 व 01074 या गाड्या इटारसी, झाशी, फतेहपूर मार्गे धावतील.
advertisement
LTT–मडगाव गाड्या 01119 आणि 01120 या कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबतील. दानापूरसाठी 01143 आणि 01144 या दैनिक गाड्या भुसावळ, जबलपूर, कटनी, प्रयागराज, बक्सर येथे थांबतील. सोलापूर मार्गासाठी 01436 आणि 01435 या गाड्या पुणे, दौंड, लातूर, बिदर, कलबुरगी येथे थांबणार आहेत.
या सर्व विशेष गाड्यांसाठी आरक्षण सुरू झाले असून, प्रवासी आयआरसीटीसी संकेतस्थळ, यूटीएस प्रणाली किंवा RailOne अॅपद्वारे तिकीट बुक करू शकतात. उन्हाळ्यातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी या गाड्या महत्त्वाची भूमिका बजावतील.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 8:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांना मोठा दिलासा, उन्हाळ्यात मुंबईतून धावणार विशेष रेल्वे गाड्या, कोणते असतील थांबे?






