Dementia : किडनीच्या व्याधीचा मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो परिणाम, संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दीर्घकालीन मूत्रपिंड विकार जसजसा वाढत जातो, तसतशी व्यक्तीची बौद्धिक क्षमता कमी होते असं 'द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन नेटवर्क ओपन' मधे प्रकाशित झालेल्या संशोधनात आढळून आलं आहे.
मुंबई : मूत्रपिंडं म्हणजे किडन्यांच्या विकाराबद्दल महत्त्वाची माहिती. मूत्रपिंडांचं आजार केवळ शारीरिक कार्यांपुरता मर्यादित नसतो. एका नवीन संशोधनानुसार, दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराचा केवळ शरीरावरच नव्हे, तर आपल्या बौद्धिक क्षमतांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
दीर्घकालीन मूत्रपिंड विकार जसजसा वाढत जातो, तसतशी व्यक्तीची बौद्धिक क्षमता कमी होते असं 'द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन नेटवर्क ओपन' मधे प्रकाशित झालेल्या संशोधनात आढळून आलं आहे.
या आजारानं ग्रस्त असलेल्यांना कामांवर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं आणि त्यांच्या कामाचा वेगही मंदावतो. वास्तविक पाहता, दीर्घकालीन मूत्रपिंड विकारात, मूत्रपिंडं दीर्घकाळापर्यंत रक्त योग्यरित्या शुद्ध करू शकत नाहीत, ज्याचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो असं संशोधकांना आढळलंय.
advertisement
या महत्त्वाच्या अभ्यासासाठी, टुलान विद्यापीठ आणि अमेरिकेतील इतर संस्थांमधील संशोधकांनी अभ्यास केला. यात, 21 ते 79 वयोगटातील 5600 हून अधिक जणांचा समावेश होता. संशोधकांनी सलग सहा वर्ष रक्त आणि मूत्राच्या नमुन्यांचं विश्लेषण केलं आणि त्यांच्या बौद्धिक कार्यक्षमतेचं मूल्यांकन केलं.
मूत्रपिंडाच्या आजाराचा मेंदूच्या अकार्यक्षमतेशी संबंध जोडताना त्यांनी शारीरिक यंत्रणेचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार, दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजारामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढू शकतो.
advertisement
हा वाढलेला रक्तदाब आणि वाढता आजार यामुळे रुग्णांमधे बौद्धिक क्षीणतेचा धोका वाढतो.
स्मृतिभ्रंशाचा वाढलेला धोका - हा अभ्यास आणखी एक गंभीर इशारा देतो. सर्वसामान्यांच्या तुलनेत, ज्यांना दीर्घकाळ मूत्रपिंडाच्या समस्या आहेत त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता अधिक असते. मूत्रपिंडाचं आरोग्य हे मेंदूच्या आरोग्याशी थेट निगडित असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 8:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dementia : किडनीच्या व्याधीचा मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो परिणाम, संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती









