फर्रुखाबाद : अनेकांना वाटते शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक जण शेती करायला धजावत नाहीत. मात्र, कोणत्याही पिकाची शेती करा, जर योग्य पद्धतीने केली तर चांगला फायदा होतो, हे एका शेतकऱ्याने सिद्ध करुन दाखवले आहे. महेंद्र सिंह असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी फक्त दोन महिन्यात लाखो रुपये कमावले आहेत. त्यांनी नेमकी कोणत्या पिकाची शेती केली, कशा पद्धतीने केली, हे जाणून घेऊयात.
advertisement
महेंद्र सिंह हे उत्तरप्रदेशातील फर्रुखाबादच्या याकूतगंज गावातील रहिवासी आहेत. फर्रुखाबादमध्ये कमी जमीन असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झेंडूच्या फुलांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरीही श्रीमंत होत आहेत. कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
महेंद्र सिंह हे मागील तीन वर्षांपासून आपल्या शेतात झेंडूच्या फुलांची शेती करत आहेत. या शेतीच्या माध्यमातून ते दोन ते तीन महिन्यात एक ते दीड लाख रुपये कमावत आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा व्यवसाय तेजीत असते. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पारंपारिक गहू आणि धान सोडून इतर फुलांची लागवड सुरू केली. पूर्वी पारंपारिक पिके घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. हे पीक घेण्यासाठी पाच ते दहा हजार रुपये खर्च येतो. आजच्या काळात फुलांशी संबंधित शेतकरी दरमहा 500 ते 70 हजार रुपयांचा नफा कमावत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी आता या दिशेने शेती करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
अशाप्रकारे करतात शेती -
त्यांनी सांगितले की, फुलांची शेती करण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या गुणवत्तेची फुले असणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे फूल तयार करण्यासाठी अशा जागेची निवड करावी, जिथे पाणी एकाच ठिकाणी थांबू नये. यानंतर, तुम्ही तुमच्या शेताची योग्य नांगरणी करा आणि सेंद्रिय खते घाला. नंतर प्रत्येक मीटरच्या अंतरावर झेंडूचे रोप लावावे. काही दिवसांनी झाडे वाढू लागतात. 50 ते 60 दिवसांनी झेंडूची फुले येण्यास सुरुवात होते आणि ती बाजारात विकली जातात, अशा प्रकारे शेती केल्यास नक्कीच चांगला फायदा होतो, असे त्यांनी सांगितले.