पाली : सध्या अनेक तरुण आपल्या भविष्याविषयी चिंतित दिसतात. असा कोणता व्यवसाय करावा, ज्यातून चांगली कमाई होईल आणि आपले आयुष्य आनंदात जाईल, असा विचार ते करताना दिसतात. मात्र, सध्याचा विचार केला असता प्रत्येक व्यवसायात अनेक प्रकारची आव्हाने असतात. अशात जर तुम्हाला कमी खर्चात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही पशुपालन हा व्यवसाय निवडू शकतात.
advertisement
एक वेळ अशी होती जेव्हा गाय आणि म्हैस आधी प्रत्येक घरात पाळली जात होती. मात्र, वेळ बदलली आणि त्यासोबतच काही घरांपुरतेच हे पशुपालन मर्यादित राहिले. मात्र, आता पुन्हा एकदा बदलत्या वेळेनुसार, गाय आणि म्हैस पालन एका व्यवसायाच्या रुपात विकसित होत आहे.
आजच्या काळात तरुणाई गाय-म्हैस पाळत असून डेअरीचा व्यवसाय करत आहेत. पाली जिल्ह्यात 6 लाख 90 हजार 678 गाय आणि म्हशी आहेत. या माध्यमातून दररोज 7 लाख लीटर दूधाचे उत्पादन होते. घरोघरी हे दूध पोहोचते. एक लीटर दूधाची किंमत ही 40 ते 80 रुपये असते. याचा अर्थ जर एका गायीने दररोज 4 लीटर दूध दिले तर दिवसाला कमीत कमी 200 रुपये होते. त्यामुळे तुम्हीही जर रोजगाराचे साधन शोधत असाल तर तुमच्यासाठी रोजगाराचा हा एक चांगला पर्याय आहे.
पाली जिल्ह्यातील आकडेवारीचा विचार केला असता 3 लाख 60 हजार गायी आहेत. तर 3 लाख 29 हजार म्हशी आहे. यांच्या माध्यमातून 7 लाख पेक्षा जास्त दूधाचे उत्पादन दररोज होते. याचा सरळ फायदा हा पशुपालकांना होतो. यामध्ये जास्त करुन तरुणाई यामध्ये आपले भविष्य पाहत आहे. पाली जिल्ह्यातील हेमावास गाव आणि चादरवाला बालाजीजवळ राहणाऱ्या तरुणाने कापडाचा व्यापार करत होता. मात्र, त्याला जेव्हा स्वत:च्या व्यवसायाबाबत मनात विचार आला तेव्हा त्याने एक गाय आणली. आज त्याच्याजवळ अनेक गायी आहेत. तसेच या माध्यमातून तो आपली उपजीविका भागवत आहे. तसेच त्याची बचतही होत आहे.
घरात कण्हेरचे झाड लावणे शुभ की अशुभ?, याच्या पिवळ्या फुलांचं महत्त्व तरी काय? महत्त्वाची माहिती
पशुसंवर्धन विभाग पाली येथील सहसंचालक डॉ. मनोज शर्मा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या काही वर्षात दूध आणि दुग्धव्यवसायाकडे तरुणांचा कल वाढला आहे. अनेक तरुणांनी एक गाय आणि म्हशीपासून सुरुवात केली होती. मात्र, आज त्यांच्याकडे 20-30 गायी, म्हशी आहे. या व्यवसायात कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाही. पण जर ते मिळाले तर याकडे तरुणाई अधिक आकर्षित होईल आणि दूध उत्पादनही वाढेल, असे ते म्हणाले.