सूत्रांनी सांगितले की,ॲपलच्या भारतातील गुंतवणूक योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ट्रम्प यांच्या विधानानंतरही कंपनीने आपले कार्य सुरू ठेवण्याची ग्वाही भारतीय सरकारला दिली आहे.
दोहा येथील एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांच्याशी थेट संवाद साधला आणि ॲपलने भारतात उत्पादन वाढवू नये, असा सल्ला दिला होता. मात्र जर ते केवळ भारतीय बाजारपेठेसाठी असेल तर ठीक आहे, असेही ते म्हणाले.
advertisement
ट्रम्प यांची Appleला धमकी,भारतात पाऊल ठेवायचं नाही; ते स्वत: काय ते बघून घेतील
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार,15 मे रोजी कतारमधील दोहा येथे एका व्यावसायिक कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, ॲपलचे सीईओ टिम कूक यांना मी सांगितले की, तुमची भारतात उत्पादन करण्याची गरज नाही, ते स्वतःची काळजी घेऊ शकतात. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, ॲपल अमेरिकेत आपले उत्पादन वाढवेल. ॲपल अमेरिकेत आपले उत्पादन वाढवणार आहे, असे ते म्हणाले.
भारताने घेतला विश्वासघाताचा बदला; पाकिस्तानला केलेल्या मदतीने वाटोळे झाले
भारताने अमेरिकेच्या आयातीवरील शुल्क पूर्णपणे माफ करण्याची ऑफर दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. दोहा येथील व्यावसायिक नेत्यांच्या एका मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, भारताने आम्हाला एक करार देऊ केला आहे. ज्यात ते अक्षरशः आमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यास तयार आहेत.
यावर बोलताना इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया (ईएलसीआयएनए) चे सरचिटणीस राजो गोयल म्हणाले, यामुळे थोडा विलंब होऊ शकतो, पण मला खरोखरच असे वाटत नाही की त्याचा भारतावर फारसा परिणाम होईल. ॲपलच्या जागतिक बाजारात आपला वाटा अजूनही खूपच कमी आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत खूप मजबूत स्थितीत आहे. यामुळे आपण निराश होऊ नये... मला खात्री आहे की डोनाल्ड ट्रम्प आपली भूमिका बदलू शकतात, असेही ते म्हणाले.
भारत ॲपलच्या जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन सारख्या कंत्राटी उत्पादकांनी भारताच्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत आपले कामकाज मोठ्या प्रमाणात वाढवले आहे आणि ॲपलच्या भारतातील आयफोन निर्यातीने गेल्या वर्षी उच्चांक गाठला आहे.
