ट्रम्प यांची Appleला धमकी,भारतात पाऊल ठेवायचं नाही; ते स्वत: काय ते बघून घेतील, Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात उत्पादन न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भारताने अमेरिकेच्या वस्तूंवरील शुल्क माफ करण्याची तयारी दर्शवली आहे, असेही त्यांनी सांगितले.
दोहा (कतार): अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज कतारच्या दोहा शहरात एका व्यापारी परिषदेत दिलेल्या वक्तव्यात मोठा गौप्यस्फोट केला. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांना भारतात उत्पादन सुरू करू नका असे स्पष्टपणे सांगितले. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
ट्रम्प यांनी असे म्हटले की, मी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना स्पष्ट शब्दांत सांगितले – भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही. जोपर्यंत ते केवळ भारतासाठीच उत्पादन करणार नसतील. आम्हाला भारतात उत्पादन उभारण्यात स्वारस्य नाही.
अमेरिकेतच उत्पादन वाढवणार
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अॅपल कंपनी आता अमेरिकेतील उत्पादन अधिक वाढवणार आहे. त्यांनी सांगितले, टिम कुक यांच्यासोबतच्या चर्चेनंतर अॅपलने ठरवले आहे की ते अमेरिकेतच उत्पादन वाढवतील. यामुळे आपल्या देशातील रोजगार वाढतील.
advertisement
टिम कुकला स्पष्ट शब्दांत बजावलं
ट्रम्प म्हणाले, कालच माझी टिम कुकसोबत थोडी चर्चा झाली. मी त्याला सांगितलं – मित्रा, आम्ही तुला खूप चांगलं वागवतो आहोत. तू $500 अब्ज गुंतवणूक करत आहेस. पण आता मला ऐकायला येतंय की तू भारतभर उत्पादन प्रकल्प उभारत आहेस. हे मला नकोय. जर तुला भारतासाठीच काही करायचं असेल तर तिथं उभारणी कर. पण आम्हाला त्यात स्वारस्य नाही.
advertisement
ट्रंप ने Apple के CEO को कहा “भारत में iPhone न बनाए”
▶️President Trump warns Apple, claims India has offered a deal with "no-tariffs"#Trump2025 #ZeroTariff #IndiaUS #TradeRelations #EconomicPolicy #DonaldTrump #India pic.twitter.com/sY6c7rm0fY
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) May 15, 2025
advertisement
भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो
ट्रम्प यांनी भारताबाबत थेट वक्तव्य करताना म्हटले, भारत जगातील सर्वात जास्त टॅरिफ लावणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे तिथं काही विकणं फारच कठीण आहे. त्यांनी आम्हाला एक सवलतीचा प्रस्ताव दिला आहे – जवळपास शून्य टॅरिफ.
ट्रम्प पुढे म्हणाले, मी टिम कुकला म्हटलं – आम्ही तुला खूप सहन केलंय. तू चीनमध्ये वर्षानुवर्षे प्रकल्प उभारलेस तरी आम्ही साथ दिली. पण आता आम्हाला भारतात काही हवं नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो.
advertisement
अॅपलकडून भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन
रॉयटर्सच्या अहवालानुसार, अॅपलने 2024 मध्ये भारतात सुमारे 40–45 दशलक्ष आयफोन बनवले, जे जागतिक उत्पादनाच्या 18–20% इतके आहे. यापैकी अंदाजे 14–15 दशलक्ष आयफोन अमेरिकेत निर्यात करण्यात आले. तर 12 दशलक्ष भारतातच विकले गेले.
मार्च 2025 मध्ये अॅपलने भारतातून तब्बल 600 टन आयफोन (सुमारे $2 अब्ज किमतीचे) अमेरिकेत निर्यात केले. यातून टाटा आणि फॉक्सकॉन या दोघांनी विक्रमी निर्यात केली असून फॉक्सकॉनने एकट्यानेच $1.3 अब्ज किमतीचे स्मार्टफोन पाठवले.
advertisement
उच्च खर्च असूनही भारत प्राधान्यक्रमात
भारतामध्ये आयफोन उत्पादनाचा खर्च चीनपेक्षा 5–8% अधिक आहे. काही प्रकरणांमध्ये तो 10% पर्यंतही वाढतो, असे रॉयटर्सने नमूद केले. तरीही अॅपलने ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांपासून बचाव करण्यासाठी भारतातील उत्पादन वाढवले आहे.
भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये नव्या वाटाघाटी
एप्रिल 2025 मध्ये अमेरिकेने भारतावर 26% टॅरिफ लावले, जे त्या वेळी चीनवर असलेल्या 100% पेक्षा अधिक टॅरिफच्या तुलनेत खूपच कमी होते. मात्र त्यानंतर वॉशिंग्टनने चीन वगळता बहुतेक देशांवरील टॅरिफ तात्पुरते स्थगित केले आहेत. ट्रम्पच्या वक्तव्यानंतर हे स्पष्ट होते की, अमेरिकेतील नेतृत्व भारतातील गुंतवणुकीकडे संशयाने पाहते आणि “अमेरिका फर्स्ट” ही भूमिका अधिक तीव्र होत आहे.
advertisement
टिम कुकचा स्पष्ट संकेत
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नुकत्याच झालेल्या कमाई अहवालात स्पष्ट सांगितले की, जून तिमाहीत अमेरिका विक्रीसाठी बहुतेक आयफोन्स भारतात बनलेले असतील. त्यांनी असंही सांगितलं की, आयपॅड, मॅकबुक, अॅपल वॉच आणि एअरपॉड्स – हे सगळे उत्पादन प्रामुख्याने व्हिएतनाममध्ये होईल.
बिझनेस नेत्यांसमोर थेट भाष्य
view commentsकतारमधील या कार्यक्रमात अनेक आंतरराष्ट्रीय व्यापारी नेते उपस्थित होते. ट्रम्प यांनी त्यांच्या खास शैलीत या महत्त्वाच्या मुद्द्यांवर थेट भाष्य करून चर्चेचा केंद्रबिंदू बनवला. ही विधाने ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाशी सुसंगत असून. जागतिक उत्पादन शृंखलांमध्ये अमेरिकेचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. भारताबाबत ट्रम्प यांचा असा परखड दृष्टिकोन आगामी अमेरिका-भारत व्यापार संबंधांवर परिणाम करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 15, 2025 3:12 PM IST
मराठी बातम्या/मनी/
ट्रम्प यांची Appleला धमकी,भारतात पाऊल ठेवायचं नाही; ते स्वत: काय ते बघून घेतील, Video


