नोकरी गेल्यानंतर काहीतरी नवीन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. घरात बसून न राहता त्यांनी अश्विनी स्वयंपाक घर या नावाने खाद्यपदार्थ बनवून विक्री सुरू केली. त्यांनी तयार केलेले पारंपरिक पदार्थ लोकांना फार आवडले. व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी पुढे हा उपक्रम अधिक विस्तारला. नंतर त्यांनी याचे नाव बदलून स्वास्थ्य बाइट्स असे ठेवले. सध्या त्या या ब्रँडच्या माध्यमातून हिमोग्लोबिन ड्रायफ्रूट लाडू विकतात.
advertisement
खाद्य व्यवसायासोबतच अश्विनी यांना हस्तकलेची आवड होती. त्या आवडीतूनच त्यांनी अस्माहास क्रिएशन्स या हँडमेड वस्तूंच्या ब्रँडची सुरुवात केली. या ब्रँडखाली त्या हँडमेड ज्वेलरी, होम डेकोर आणि गिफ्ट वस्तू तयार करतात आणि आज त्यांच्या उत्पादनांची विक्री संपूर्ण भारतात होते.
हे दोन्ही व्यवसाय त्या आज स्वतः सांभाळत आहेत आणि याच व्यवसायांमधून त्यांना दरमहा 60 ते 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या आज यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या यशामागे पती, सासू-सासरे आणि आईवडील यांचे मोठे योगदान आहे, हे त्या नम्रपणे सांगतात.
अश्विनी भालेराव आज अनेक महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. त्या म्हणतात अडथळे हे यशाच्या वाटेवरचे टप्पे आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत रहा आणि मागे वळून न पाहता पुढे चालत राहा. त्यांचा प्रवास हे सिद्ध करतो की जिद्द, मेहनत आणि कौटुंबिक पाठबळ याच्या जोरावर कोणतीही महिला यशस्वी उद्योजिका होऊ शकते.