हे पर्सनल लोन कोण घेऊ शकते
बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुमचे किमान वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असेल, तर तुम्ही या पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. कोणताही ग्राहक त्याच्या एकूण मासिक उत्पन्नाच्या 20 पट पर्यंत पर्सनल लोन घेऊ शकतो. हे जास्तीत जास्त 20 लाख रुपये असू शकते. बँकेचे म्हणणे आहे की या कर्जासाठी हमीदाराची आवश्यकता नाही. कमीत कमी कागदपत्रांसह या पर्सनल लोनसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला कर्जाच्या रकमेच्या 1% + GST प्रोसेसिंग फीस म्हणून भरावे लागेल.
advertisement
Wife सोबत Post Officeच्या स्किममध्ये करा गुंतवणूक! दरमहा मिळेल 9 हजारांचं फिक्स व्याज
कोणतेही हिडेन चार्ज नाही
बँकेनुसार, महा बँक पर्सनल लोन योजनेअंतर्गत घेतलेल्या या पर्सनल लोनवर कोणत्याही प्रकारचा हिडन चार्ज नाही. तुम्ही तुमच्या कर्जाला ट्रॅक देखील करु शकता. तसेच, प्रीपेमेंटवर कोणतेही शुल्क नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की 9 टक्के व्याजदराने हे पर्सनल लोन फक्त उत्कृष्ट क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांनाच उपलब्ध असेल. बँकेनुसार, जर तुमचा CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर 800 किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्हाला सर्वात स्वस्त दराने वैयक्तिक कर्ज सहज मिळू शकते.
पर्सनल लोनवर टॅक्स बेनिफिट कसं मिळतं? एक नाही आहेत अनेक पद्धती, घ्या जाणून
EMI गणना समजून घ्या
तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रकडून 9 टक्के व्याजदराने 5 वर्षांसाठी 9 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले, तर कॅलक्युलेशननुसार, तुमचा मासिक EMI 18,683 रुपये असेल. कॅलक्युलेशननुसार, तुम्ही या कर्जावर फक्त व्याज म्हणून ₹ 2,20,951 भराल. म्हणजे शेवटी तुम्हाला एकूण ₹11,20,951 बँकेला परत करावे लागतील. कर्जाच्या बाबतीत, एक गोष्ट समजून घ्या की परतफेडीचा कालावधी जितका कमी असेल तितका कमी व्याज तुम्ही द्याल. हो, तुमचा प्रीमियम थोडा जास्त असू शकतो.