मुंबई: नवरत्न डिफेन्स PSU भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर मोठी माहिती दिली. कंपनीने सांगितले की- 16 सप्टेंबर 2025 नंतर BELला तब्बल 1,092 कोटी रुपयांचे अतिरिक्त ऑर्डर मिळाले आहेत.
advertisement
कंपनीच्या मते, या नव्या ऑर्डर्समध्ये-
इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) सिस्टीम अपग्रेड, डिफेन्स नेटवर्क अपग्रेड,टँक सब-सिस्टीम,TR मॉड्यूल, कम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स (EVMs), स्पेअर पार्ट्स आणि सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.
BEL ची ऑर्डर बुक पोजिशन
1 एप्रिलपर्यंत BEL ची ऑर्डर बुक पोजिशन 71,650 कोटी रुपये इतकी होती. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीने आतापर्यंत 7,348 कोटी रुपयांच्या ऑर्डर्सची घोषणा केली आहे. जी वार्षिक अंदाजे 27,000 कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या सुमारे 27% इतकी आहे.
यामध्ये 30,000 कोटी रुपयांचा क्विक-रिअॅक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईल ऑर्डर समाविष्ट केलेला नाही.
नफा वाढ
जून 2025 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित (कन्सोलिडेटेड) नफा 23% वाढून 969.91 कोटी रुपये झाला. जो मागील वर्षी याच तिमाहीत 791 कोटी रुपये होता.
शेअरचा परफॉर्मन्स
सोमवारी कंपनीचा शेअर 1.24% वाढीसह 400.80 वर बंद झाला.
मागील एका वर्षात BEL च्या शेअर्समध्ये तब्बल 40.58% वाढ नोंदवली गेली आहे.
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.