नवीन नियमांतर्गत काय बदल झाले आहेत?
भांडवल बाजारात गुंतवणूक आणि विमा प्रीमियम भरण्याची मर्यादा देखील 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तसंच, एका दिवसात जास्तीत जास्त 10 लाख रुपये भरता येणार नाहीत. म्हणजेच, नवीन नियमांनुसार, भांडवली बाजार, विमा प्रीमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, प्रवास आणि सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) सारख्या श्रेणींमध्ये प्रति व्यवहार मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यापैकी, तुम्ही एका दिवसात 10 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करू शकाल.
advertisement
कोणती बँक देतेय 7.3% व्याजावर Home Loan? चेक करा स्वस्तात कर्ज देणाऱ्या बँकांची लिस्ट
दागिने आणि बँकिंग सर्व्हिस
तसेच, UPI द्वारे दागिने खरेदी करण्याची मर्यादा प्रति व्यवहार 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे (पूर्वी 1 लाख रुपये). या श्रेणीमध्ये, तुम्ही एका दिवसात 6 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करू शकणार नाही. डिजिटल ऑनबोर्डिंगद्वारे मुदत ठेवीसारख्या बँकिंग सेवांसाठी, प्रति व्यवहार मर्यादा देखील प्रति दिन 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. संच, P2P पेमेंटची मर्यादा प्रति दिन 1 लाख रुपये राहील. UPI व्यवहारांची मर्यादा वाढवणे NPCI ची वचनबद्धता दर्शवते, ज्या अंतर्गत ते मोठे व्यवहार सोपे करून यूझर्सचा अनुभव सुधारू इच्छिते. या हालचालीमुळे विविध क्षेत्रांमध्ये पेमेंट प्रोसेस सुलभ होईल, ज्यामुळे ग्राहक आणि व्यवसाय दोघांनाही फायदा होईल.