लाइफ इन्शुरन्स प्लॅन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. त्यात लाइफ कव्हरसह गुंतवणुकीचा फायदा मिळतो. हा विमा घेतल्यानंतरच्या काळात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला डेथ बेनिफिट आणि गुंतवणूक केलेल्या रकमेसह व्याज दिलं जातं. इन्शुरन्सचा कालावधी पूर्ण झाल्यास मॅच्युरिटी अमाउंट म्हणून गुंतवणूक केलेल्या रकमेसह व्याज दिलं जातं.
टर्म इन्शुरन्समध्ये एका निश्चित कालावधीसाठी कव्हर मिळतं. प्लॅनच्या कालावधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला पैसे मिळतात. ही रक्कम निश्चित असते. टर्म इन्शुरन्सचा हप्ता दर वर्षी भरला जातो. तसंच, मासिक, त्रैमासिक आणि षण्मासिक पद्धतीनेही हप्ता भरता येतो. प्लॅनचा कालावधी संपल्यानंतर त्याचा कोणताही रिटर्न मिळत नाही.
advertisement
money: शेअर मार्केटमध्ये काही तरी मोठं घडणार, आता 15 मे रोजी काय होणार?
या दोन्ही प्रकारच्या इन्शुरन्समध्ये डेथ बेनिफिट मिळतो; मात्र लाइफ इन्शुरन्समध्ये प्रीमिअमवर रिटर्न मिळतो, तसा टर्म इन्शुरन्समध्ये मिळत नाही.
लाइफ इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटीनंतर प्रीमिअम रकमेवर व्याजासह एकरकमी अमाउंट मिळते. हा मॅच्युरिटी बेनिफिट टर्म इन्शुरन्समध्ये नाही.
टर्म इन्शुरन्समध्ये लाइफ कव्हर मिळतं. त्याच्या प्लॅनमध्ये प्रीमिअमची रक्कम कमी असते. लाइफ इन्शुरन्सचा प्रीमिअम त्या तुलनेत जास्त असतो.
टर्म इन्शुरन्समध्ये कोणत्याही प्रकारची कर्जसुविधा मिळत नाही. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम अनेक वर्षं भरल्यानंतर कर्जाची सुविधा मिळू शकते.
प्रत्येक प्लॅनचे फायदे वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार यातल्या एका विम्याची निवड करावी. कमी कालावधीसाठी विमा हवा असेल,तर टर्म इन्शुरन्स स्वस्त पडेल. लाइफ टाइमसाठी कव्हरेज हवं असेल, तर महागड्या प्रीमिअमचा लाइफ इन्शुरन्स प्लॅन योग्य ठरेल.
कोणत्याही प्रकारचा विमा काढायचा असल्यास विम्याची कागदपत्रं नीट वाचायला हवीत आणि नीट माहिती घ्यायला हवी. तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्यायला हवा आणि मगच विमा घ्यायला हवा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये.