नव्या टॅक्स रिजीममधून अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 12 लाखपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. त्यामुळे आता नव्या टॅक्स रिजीममधून अर्ज करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टॅक्स पेअर्सवर जास्तीचा भार पडत असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमधून ही घोषणा केली आहे.
आता तुम्ही 1 लाख रुपये महिन्याला कमवले तरी तुमच्या पगारातून टॅक्स कापला जाणार नाही. त्यामुळे आता 1 लाख रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. एफएमसीजी स्टॉक्स वधारले आहेत. हे बजेट गेमचेंजिंग बजेट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक बदल बघायला मिळतील. एफएमजी स्टॉक चांगले नंबर्स देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर जुन्यामधून सगळ्यांना नवीन टॅक्समध्ये शिफ्ट करण्यासाठी ही योजना केली जात आहे असंही काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
कर स्लॅबमध्ये बदल
0 ते 4 लाख शून्य
4 ते 8 लाख 5%
8 -12 लाख 10%
12 ते 16 लाख 15%
16 ते 20 लाख 20%
20 ते 24 लाख 25%
24 लाख रुपयांपेक्षा जास्त 30%
गेल्या काही वर्षांमध्ये आयकर सवलत मर्यादा
2005: Rs 1 लाख
2012: Rs 2 लाख
2014: Rs 2.5 लाख
2019: Rs 5 लाख
2023: Rs 7 लाख
2025: Rs 12 लाख
