DA मध्ये 3% ते 4% वाढीची शक्यता
केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा (DR) वाढवते. यंदा DA मध्ये 3% ते 4% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत वेतनाच्या 53% इतका DA मिळतो.
इतकी पगारवाढ? विश्वास बसणार नाही! कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी थेट 51,480 + पेन्शन
advertisement
DA वाढीमुळे पगार आणि निवृत्ती वेतनावर परिणाम
जर DA चार टक्क्यांनी वाढला, तर कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार कितीने वाढेल. एका कर्मचाऱ्याचे मूलभूत वेतन 36,500 रुपये असल्यास, सध्या त्याचा DA हा 19,345 रुपये आहे. DA मध्ये 4% वाढ झाल्यास, तो 20 हजार ८०५ रुपये होईल. तसेच जानेवारीपासूनची थकबाकी देखील मिळेल.
निवृत्ती वेतनधारकाचे पेन्शन 9 हजार रुपये असल्यास त्याला सध्या DR 4 हजार 770 रुपये मिळतो. DR मध्ये 4% वाढ झाल्यास, तो 5 हजार 130 रुपये होईल.
शेअर बाजाराचे काही खरे नाही, छोट्या गुंतवणूकदारांना पैसे वाचवायचे असतील तर...
DA दर कशावर ठरतो?
महागाई भत्त्याचा दर ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) वर आधारित असतो. सरकार या इंडेक्सच्या मागील 12 महिन्यांच्या सरासरी आकडेवारीनुसार DA आणि DR च्या दरात वाढ करत असते. सध्या 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारक DA आणि DR च्या वाढीची वाट पाहत आहेत.
कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या दृष्टीने होळीपूर्वी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. आता सरकार यासंबंधी अधिकृत घोषणा कधी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.