Share Market: शेअर बाजाराचे काही खरे नाही, छोट्या गुंतवणूकदारांना पैसे वाचवायचे असतील तर निर्णय घेताना...

Last Updated:

Share Market Mutual Fund: स्मॉलकॅप आणि मिडकॅपमधील गुंतवणुकीचे नेमके काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशा शेअर्समधील गुंतवणूक जर दीर्घकाळासाठी केली तर चांगला परतावा मिळू शकतात.

News18
News18
मुंबई: शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे गेल्या काही दिवसात गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारातील घसरणीचा हा ट्रेंड पुढील काही दिवस तसाच कायम राहणार आहे. यामुळेच म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सबाबत गुंतवणूकदारांचा संभ्रम वाढला आहे. काही दिवसांपूर्वी ICICI प्रुडेंशियलचे शंकर नरेन यांनी स्मॉलकॅप फंड्सबाबत दिलेल्या विधानामुळे बाजारात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या मते, नजीकच्या भविष्यात कमाई करायची असेल, तर स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सपासून दूर राहणे चांगले. त्यांनी या गुंतवणुकीचा कालावधी किमान 20 वर्षांचा असावा, असेही स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर Quant Mutual Fund चे संस्थापक संदीप टंडन यांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे. टंडन यांच्या मते, 5-10 वर्षांचा दीर्घकालीन दृष्टिकोन असेल, तर स्मॉल आणि मिडकॅपमध्ये नक्कीच गुंतवणूक करावी. ते लाइव्ह मिंटला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. इतिहास पाहिला तर स्पष्ट होते की 3, 5 किंवा 10 वर्षांत स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सनी लार्जकॅप शेअर्सच्या तुलनेत चांगला परतावा दिला आहे. मात्र, ज्यांना केवळ 1 वर्षाचा टार्गेट ठेवायचा आहे, त्यांनी मोठ्या लार्जकॅप किंवा मेगा लार्जकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, असेही ते म्हणाले.
advertisement
गुंतवणुकीची नवी रणनीती Sell on Rally
संदीप टंडन यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले. यापूर्वी गुंतवणूकदार Buy on Dip या रणनीतीचा अवलंब करत होते. पण आता हे चित्र बदलत चालले आहे. गुंतवणूकदार Sell on Rally ही पद्धत वापरत आहेत.
advertisement
टंडन यांच्या मते, अनेक गुंतवणूकदार बाजार तेजीत येताच आपली गुंतवणूक विकून नफा मिळवण्याचा विचार करत आहेत. यामागे मार्च महिन्यातील आर्थिक वर्षाचा शेवट हा मोठा कारणीभूत घटक आहे. त्यामुळे मार्चच्या अखेरीस बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून येऊ शकते. मात्र 15 एप्रिलनंतर पुन्हा खरेदी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
गुंतवणूकदारांनी काय करावे?
-दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी: 5-10 वर्षांचा कालावधी ठेवून स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
-कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी: फक्त लार्जकॅप आणि मेगा लार्जकॅप शेअर्सचा विचार करावा.
-मार्च अखेरीस बाजारात अस्थिरता राहील, मात्र एप्रिलनंतर तेजी येऊ शकते.
-शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत वेगवेगळे असल्याने गुंतवणूकदारांनी घाईगडबड न करता स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार निर्णय घ्यावा, असे सुचवले जात आहे.
मराठी बातम्या/मनी/
Share Market: शेअर बाजाराचे काही खरे नाही, छोट्या गुंतवणूकदारांना पैसे वाचवायचे असतील तर निर्णय घेताना...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement