सोलापूर शहरातील सुनील नगर येथे 19 वर्षीय चेतन दिंडोरे राहण्यास असून बीकॉम सेकंड इयरमध्ये शिक्षण घेत आहे. तर चेतनचे वडील एका साखर कारखान्यामध्ये कामाला आहेत. वाढत असलेली महागाई, बेरोजगारी पाहता शिक्षणाचा खर्च निघावा आणि घरच्यांनाही मदत व्हावी या उद्देशाने चेतन याने काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असा निश्चय केला.
प्लास्टिकमुळे घेतला निर्णय, कापडी बॅग्स विक्रीचा सुरू केला व्यवसाय, पौर्णिमा यांची दिवसाला ऐवढी कमाई
advertisement
सोशल मीडियावर येणारे व्यवसायाचे व्हिडिओ पाहून त्याने मसाला चिप्स व्यवसाय करायचा निर्णय घेतला. सोलापूर शहरातील एका नामांकित कॉलेजच्या समोर त्याने स्टार्टअप म्हणून हा व्यवसाय सुरू केला आहे. बाहेर मिळणारे रेडीमेड चिप्स आणून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला आणि मेयोनीस टाकून हा मसाला चिप्स खाण्यासाठी ग्राहकांना बनवून दिला जातो. एका मसाला चिप्स प्लेटची किंमत 30 रुपये पासून ते 100 रुपयांपर्यंत आहे.
चेतन याने एका महिन्या अगोदर या व्यवसायाला सुरुवात केली असून दररोज 100 पेक्षा अधिक मसाला चिप्स प्लेटची विक्री ते करत आहेत. तर सर्व खर्च वजा करून ते महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई करत आहेत. शिक्षण घेत असताना अभ्यासात ज्ञान नसेल किंवा उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसेल तर तरुणांनी न लाजता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, सुरुवातीचा काही काळ कठीण जातो पण व्यवसायातून यश हमखास मिळते असा सल्ला 19 वर्षीय चेतनने दिला आहे.