तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 60 रुपयांपर्यंत कपात केली आहे. नवीन दर आज, मंगळवार आजपासून लागू करण्यात आले आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. ते दर मागच्या महिन्यानुसार कायम आहेत. त्यामुळे गृहिणींना कोणताही दिलासा मिळालेला नाही. छोटे व्यावसायिक आणि हॉटेल इंडस्ट्रिला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातील ही कपात व्यावसायिकांसाठी एक चांगली बातमी आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील कपातीनंतर, देशाची राजधानी दिल्लीत आता याची किरकोळ किंमत 1665 रुपये झाली आहे. यापूर्वी तो 1723.50 रुपयांना मिळत होता. मुंबईत (Mumbai LPG Price) या सिलेंडरची किंमत 1674.50 रुपयांवरून 1616.50 रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये 1881 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 1823.50 रुपयांना मिळणार आहे.
मोठी बातमी: सरकारकडून Small Savings Schemesच्या व्याजदर जाहीर, बचत करणार आहात? मग हे वाचा
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यातही व्यावसायिक सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली होती. याआधीही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या आणि 1 जून 2025 रोजी 24 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये जून आणि जुलै दोन्ही महिन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळणार नाही.
LPGचे हे ग्राहक आता ऑनलाइन बुक करु शकणार नाही 'गॅस सिलिंडर', जाणून घ्या कारण
सिलेंडरचे दर कमी झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळेल, जे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करतात. कमी झालेल्या किमतींमुळे या व्यवसायांचा परिचालन खर्च कमी होईल आणि ते आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा देऊ शकतील.