मोठी बातमी: सरकारकडून Small Savings Schemesच्या व्याजदर जाहीर, बचत करणार आहात? मग हे वाचा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Latest Interest Rates: सरकारने जुलै ते सप्टेंबर 2025 या तिमाहीसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याज दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग सहाव्या तिमाहीत हे दर जैसे थे ठेवण्यात आले असून गुंतवणूकदारांनी दिलासा मानला आहे.
नवी दिल्ली: सरकारने एक अधिसूचना जारी करून मोठी माहिती दिली आहे. अधिसूचनेनुसार, सरकारने जुलै-सप्टेंबर 2025 तिमाहीसाठी पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम (SCSS), नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC), पोस्ट ऑफिस एफडी, आरडी आणि मासिक आय योजना (POMIS) यांच्या व्याज दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Small Savings Schemes या भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सुरक्षित गुंतवणूक योजना आहेत. ज्यांचा उद्देश लोकांना बचतीसाठी प्रोत्साहित करणे आहे. या योजना खासकरून लहान गुंतवणूकदार, वरिष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीवर सरकार एक निश्चित व्याजदर देते, जो तिमाही आधारावर ठरवला जातो.
advertisement
जुलै–सप्टेंबर 2025 साठी Small Savings Schemes चे व्याज दर:
पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) – 7.1%
सुकन्या समृद्धी योजना (SSY) – 8.2%
सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम (SCSS) – 8.2%
नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) – 7.7%
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट (FD) – 6.9% ते 7.5% (1 ते 5 वर्षांच्या मुदतीसाठी)
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट (RD) – 6.7%
advertisement
किसान विकास पत्र (KVP) – 7.5%
पोस्ट ऑफिस मासिक आय योजना (POMIS) – 7.4%
ही सलग सहावी तिमाही आहे की या योजनांवरील व्याज दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, वित्त वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (1 जुलै 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत) विविध स्मॉल सेविंग्स स्कीम्सवरील व्याजदर पहिल्या तिमाहीत (1 एप्रिल 2025 ते 30 जून 2025 पर्यंत) अधिसूचित दरांप्रमाणेच राहतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2025 8:14 PM IST
मराठी बातम्या/मनी/
मोठी बातमी: सरकारकडून Small Savings Schemesच्या व्याजदर जाहीर, बचत करणार आहात? मग हे वाचा