मुंबई : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने Godrej Agrovet Limited ला Astec Lifesciences च्या अप्रत्यक्ष अधिग्रहणामध्ये विलंबाने केलेल्या खुलास्याबाबत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रशासनिक इशारा दिला आहे. सेबीने 29 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, कंपनीने SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 अंतर्गत आवश्यक असलेल्या खुलाशांच्या नियमांचे पालन केले नाही.
advertisement
हिस्सेदारीतील बदलांचा खुलासा उशिरा
सेबीच्या माहितीनुसार, गॉदरेज अॅग्रोवेटने Astec Lifesciences च्या इक्विटीमध्ये 2% पेक्षा जास्त हिस्सेदारीत झालेल्या बदलांचा खुलासा उशिराने केला.
कोणत्या चार प्रकरणांत झाला विलंब?
9 फेब्रुवारी 2017 : 2,725 दिवसांचा विलंब
20 मार्च 2019 : 383 दिवसांचा विलंब
28 फेब्रुवारी 2020 : 39 दिवसांचा विलंब
27 मार्च 2020 : 11 दिवसांचा विलंब
SEBI ची कडक इशारा
SEBI ने कंपनीला पुढील काळात नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच इशारा दिला की, पुन्हा अशा प्रकारची चूक झाल्यास SEBI Act आणि संबंधित नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल.