TRENDING:

12 लाखांचं पॅकेज असलेली नोकरी एका क्षणात गेली, चेतनने शोधला नवा पर्याय, आता महिन्याला 1 लाख कमाई!

Last Updated:

कोरोना काळात त्यांची ही हातची नोकरी त्यांना गमवावी लागली. परंतु यानंतर देखील चेतन यांनी आपला धीर सोडला नाही.

advertisement
advertisement

नाशिक : कोरोना काळ हा अनेक लोकांसाठी खूप संकटाचा काळ बनला होता. अनेक लोकांना यात आपली चांगली नोकरी गमवावी लागली. यातील नाशिकचे चेतन कुटे देखील आहेत. चेतन कुटे कोरोना महामारी येण्याच्या अगोदर एका मानांकित कंपनीत 12 लाखांच्या पॅकेजवर काम करीत होते. परंतु कोरोना काळात त्यांची ही हातची नोकरी त्यांना गमवावी लागली. परंतु यानंतर देखील चेतन यांनी आपला धीर सोडला नाही. नोकरी गेल्यानंतर देखील त्यांनी हार न मानता आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि पुन्हा दुसरी नोकरी देखील मिळवली. परंतु पुन्हा नोकरी राहील का जाईल याची कुठलीही हमी नसल्याने त्यांनी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचे ठरविले.

advertisement

नोकरी सोडल्यानंतर चेतन यांच्या पत्नीने त्यांना नेहमीच साथ दिली. दोघा कुटे दाम्पत्यानं मिळून एक गोट फार्म चालू केला. नोकरी सोडल्यामुळे चेतन हे दिवस-रात्र व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यांचा हा गोट फार्म देखील यशस्वी केला. परंतु या व्यवसायातून वार्षिक उत्पन्न येत होते म्हणून त्यांनी दुसरा देखील व्यवसाय सुरू करावा असे ठरविले. त्यानंतर याच व्यवसायाला जुळून चिकन आणि मटण विक्रीचा धंदा सुरू केला. त्यानंतर त्यांची या व्यवसायात देखील चांगली कमाई होत गेली.

advertisement

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानी घेतला निर्णय, केली रेशीम शेती, वर्षाला साडेतीन लाख कमाई

पुढे ते आपले हे चिकन आणि मटण नाशिकमधील नामांकित अशा अनेक हॉटेलमध्ये पोहोचवू लागले. चेतन यांच्या पत्नी योगिता यांनी आपण चिकन आणि मटण हे विकतच आहोत तर मग आपण याचे हॉटेल सुरू करावे अशी कल्पना चेतन यांना दिली.

advertisement

त्यानंतर दोघांनाही खाद्यपदार्थ बनविण्याची आवड असल्याने चिकन आणि मटण खिमा याचे दुकान लावावे असा विचार केला. परंतु, आपण या व्यवसायात नवीन आहोत. मोठी इन्व्हेस्टमेंट केली आणि कधी पुढे ते चालले नाही तर मोठे नुकसान होईल. या विचाराने आणि नाशिकमध्ये रोडवर कुठेच खिमा पाव मिळत नाही याकरता छोट्या हातगाडीवर खिमा पाव याचा गेल्या काही महिन्यांपासून व्यवसाय सुरू केला आहे. आज हे दाम्पत्य या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 1 लाखांच्या वरती उत्पन्न घेत आहे. त्यांच्या या खिमा पावचे चाहते नाशिकमधील कानाकोपऱ्यातून यांच्याकडे खिमाची चव चाखण्यासाठी येत असतात.

advertisement

तुम्हाला देखील या खिमा पावचा आस्वाद घ्यायचा असल्यास नाशिकमधील गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक, जनहित हॉस्पिटलच्या समोर यांची गाडी रोज संध्याकाळी हे लावत असतात.

मराठी बातम्या/मनी/
12 लाखांचं पॅकेज असलेली नोकरी एका क्षणात गेली, चेतनने शोधला नवा पर्याय, आता महिन्याला 1 लाख कमाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल