TRENDING:

Credit Card लिमिट वाढवण्याची ऑफर मिळत असल्यास घ्यावी की नाही? फायदा होतो की नुकसान?

Last Updated:

Credit Card ची लिमिट जेवढी असते तेवढा पैसा आपण खर्च करतो. यामुळे काही काळानंतर तुमच्यावरील कर्जाचं ओझं वाढू लागतं. अशा वेळी क्रेडिट कार्डची लिमिट वाढवावी की नाही असा प्रश्न असतो.

advertisement
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीचं क्रेडिट कार्ड घेऊन त्याचा वापर सुरु करतात. तेव्हा कंपनी तुम्ही क्रेडिट कार्ड कसं वापरता हे बारीक बघते. कंपनीला वाटलं की, तुम्ही क्रेडिट कार्डवर जास्त अवलंबून नाहीत आणि नेहमी वेळेवर बिल पेमेंट करतात तर काही काळानंतर कंपनी तुम्हाला क्रेडिट लिमिट वाढवण्याची ऑफर देते. वरून बघितले तर तुम्हाला ते फायदेशीर वाटेल पण कधी कधी क्रेडिट लिमिट वाढवल्याचा तोटाही सहन करावा लागतो. तुम्ही क्रेडिट लिमिट वाढवण्याची ऑफर कधी स्वीकारावी आणि कधी स्वीकारु नये याविषयी जाणून घेऊया.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड
advertisement

खरंच गरज असेल तेव्हाच स्वीकारा ऑफर

तुम्हाला तुमची क्रेडिट लिमिट वाढवण्याची ऑफर आली तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा खर्च काय आहे हे पाहावे. खर्च लक्षात घेता, जर तुम्हाला खरोखरच गरज असेल तर तुम्ही ही ऑफर स्वीकारू शकता. जर तुमचा खर्च तुमच्या सध्याच्या लिमिटपेक्षा जास्त असेल आणि तुमची लिमिट जास्त असावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही क्रेडिट लिमिट वाढवण्याची ऑफर घेऊ शकता.

advertisement

Railway: येथे वर्गणी घेऊन लोक तिकीट काढतात पण प्रवास करत नाही, इंट्रेस्टिंग आहे कारण

तर फायद्याऐवजी होईल नुकसान

अनेक लोकांना शॉपिंगची खूप आवड असते. ते क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गरज नसताना काही ना काही सामान खरेदी करत राहतात. तुम्हीही त्याच लोकांमधून एक असाल तर जास्त लिमिटची ऑफर अजिबात स्विकारु नका. कारण तुमच्याकडे जास्त लिमिट असेल तेव्हा तुम्ही खर्च देखील जास्त करु लागाल. अशा वेळी ऑनलाइन सेल किंवा मॉलमधून ईएमआयवरुनही तुम्ही गरजेशिवाय साहित्य खरेदी कराल. मग तुम्हाला बिल पेमेंट करण्यासाठी दर महिन्याला प्रॉब्लम येतील.

advertisement

शॉर्ट,मिड आणि लॉन्ग टर्म इनव्हेस्टमेंटमध्ये फरक काय? कुठे गुंतवणूक करणं फायदेशीर?

क्रेडिट कार्ड कर्जाचा सापळा बनू नये

तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट जितकी जास्त असेल तितका तुम्ही खर्च करता. काही काळानंतर, तुमच्या लक्षात येईल की दर महिन्याला तुमच्या पगाराचा मोठा भाग क्रेडिट कार्डचे बिल भरण्यात खर्च होत आहे. त्याच वेळी, तुम्हाला अशी कोणतीही महत्त्वाची गोष्ट मिळणार नाही ज्यासाठी तुम्ही एवढ्या कर्जाचा बोजा सहन करत आहात. अशा परिस्थितीत, तुमचे उत्पन्न आणि खर्च लक्षात घेऊन काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच तुम्ही जास्त लिमिटची ऑफर स्वीकारणे महत्त्वाचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Credit Card लिमिट वाढवण्याची ऑफर मिळत असल्यास घ्यावी की नाही? फायदा होतो की नुकसान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल