DA वाढीमुळे वेतन किती वाढणार?
महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनाच्या (Basic Pay) टक्केवारीत दिला जातो. उदा. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूलभूत वेतन 36,500 रुपये असेल, तर त्याचा सध्याचा DA 19,345 रुपये आहे. नव्या 2% वाढीनंतर त्याचा DA 20,075 रुपये होईल. याशिवाय जानेवारीपासून DA वाढीचा एरियरही मिळणार आहे.
9 शेअर्स आयुष्य बदलून टाकतील; आता पैसे गुंतवा पुढील सात पिढ्यांची चिंता मिटेल
advertisement
त्याचप्रमाणे, जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाची (pensioner) मूळ पेन्शन 9,000 रुपये असेल. तर त्याला सध्या 4,770 रुपये DA मिळतो. नवीन दरांनुसार हा वाढून 4,950 रुपये होईल.
DA वाढीचे वेळापत्रक आणि गणना कशी होते?
केंद्र सरकार वर्षातून दोनदा DA वाढवते – जानेवारी आणि जुलै महिन्यात. महागाई भत्त्याचा दर ठरवण्यासाठी ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) चा वापर केला जातो. हा निर्देशांक देशातील महागाईच्या दरानुसार केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA ची गणना करण्यासाठी वापरला जातो.
22 टक्के लोक देश सोडायच्या तयारीत, सर्व्हेतून धक्कादायक गोष्टी समोर आल्या
पेंशनर्सना महागाई सवलत (DR) कशी मिळेल?
निवृत्तीवेतनधारकांना DA ऐवजी महागाई सवलत (Dearness Relief - DR) दिली जाते. DA वाढीचा लाभ पेंशनर्सनाही मिळतो आणि त्यांच्या पेन्शनमध्येही यामुळे वाढ होते. सरकारने यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये DA मध्ये 3% वाढ केली होती, तर त्याआधी मार्च 2023 मध्ये 4% वाढ करण्यात आली होती.
देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
भारतामध्ये सध्या सुमारे 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत. DA वाढीमुळे त्यांना वेतन आणि पेन्शनमध्ये थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
EPFO खातेदारांसाठी क्रांतिकारी निर्णय; PFचे पैसे थेट ATM, UPIद्वारे काढता येणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल का?
DA वाढीचा निर्णय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला जातो. मात्र, बहुतेक राज्य सरकारे केंद्राच्या धर्तीवर आपल्या कर्मचाऱ्यांचा DA वाढवतात. काही राज्ये स्वतःच्या निर्णयानुसारही DA वाढवतात. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही लवकरच चांगली बातमी मिळू शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
