PF Withdrawal Rule Change: EPFO खातेदारांसाठी क्रांतिकारी निर्णय; PFचे पैसे थेट ATM, UPIद्वारे काढता येणार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
PF Withdrawl From ATM-UPI: EPFO सदस्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. लवकरच PFचे पैसे थेट UPI आणि ATMद्वारे सहज काढता येणार आहेत. सरकारने यास मंजुरी दिली असून, मे-जूनपासून ही सुविधा लागू होईल.
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) खातेधारकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मे महिन्याच्या अखेरीस सदस्यांना मोठी सुविधा तयारी केली आहे. विशेष म्हणजे पूर्वी एटीएममधून पीएफ काढण्याची चर्चा होती. मात्र आता संघटनेने सांगितले आहे की, फक्त एटीएममधूनच नाही तर UPI द्वारेही PFचे पैसे काढता येणार आहेत. यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.
ईपीएफओने शिफारस मंजूर केली
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी या संदर्भात एक मोठे अपडेट शेअर केले आहे. ईपीएफओ सदस्य या वर्षी मे किंवा जूनच्या अखेरीस UPI आणि ATM द्वारे PF चे पैसे काढू शकतील. ते थेट UPI वर त्यांच्या PF खात्यातील शिल्लक पाहण्यास सक्षम असतील आणि पात्र असल्यास 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील. तसेच त्यांना त्यांचे PFचे पैसे त्यांच्या पसंतीच्या बँकेत हस्तांतरित करण्याची सुविधा मिळेल.
advertisement
ऑटो क्लेम सेवेमुळे सोपे होणार
डावरा यांच्या मते, नवीन सुविधेअंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे दावे आधीच स्वयंचलित केले जातील. PF खातेधारकांना त्यांचे EPFO खाते त्यांच्या UPI (Google Pay, PhonePe किंवा Paytm) मध्ये लिंक करण्याची सुविधा मिळेल. ऑटो क्लेम सेवेमुळे सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत PF क्लेम प्रोसेसिंगसाठी सुमारे 3 दिवस लागत होते. पण UPI द्वारे हे काम लगेच होणार आहे. नियम सतत सोपे केले जात आहेत..., असे त्यांनी सांगितले.
advertisement
न्यायाधीशाच्या घरात बेहिशोबी रोकड, तुम्ही घरी किती रोख पैसे ठेवू शकता?
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी एटीएम आणि UPI मधून PF काढण्याच्या सुविधेबद्दल बोलताना सांगितले की, EPFO ने त्यांच्या सर्व प्रक्रिया डिजिटल करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. PF पैसे काढणे सोपे आणि व्यवस्थापित करण्यासाठी 120 डेटाबेस एकत्र केले गेले आहेत. आता 95 टक्के दावे स्वयंचलित आहेत आणि ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यावर सतत काम सुरू आहे.
advertisement
पेन्शनधारकांना सुविधा
डावरा पुढे म्हणाल्या की, देशातील पेन्शनधारकांनाही अलीकडील सुधारणांमुळे मोठा फायदा झाला आहे. डिसेंबर 2024 पासून सुमारे 78 लाख पेन्शनधारकांना कोणत्याही बँक शाखेतून (Bank Branch) पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्या म्हणाल्या की, पूर्वी ही सुविधा काही निवडक बँकांपुरती मर्यादित होती. पण ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. कामगार सचिवांच्या मते, अशा सुधारणांवर पुढे जाणे सोपे नव्हते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 26, 2025 8:24 PM IST
मराठी बातम्या/मनी/
PF Withdrawal Rule Change: EPFO खातेदारांसाठी क्रांतिकारी निर्णय; PFचे पैसे थेट ATM, UPIद्वारे काढता येणार