Stock Market: शेअर बाजारात पैसे गुंतवणे म्हणजे आत्मघात; भूकंप नव्हे त्सुनामी येणार, फंड मॅनेजरने इशाऱ्याने झोप उडाली

Last Updated:

Share Market Prediction: शेअर बाजारात मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडच्या CIO शैलेश राज भान यांच्या मते, हे शेअर्स अजूनही ओव्हरवॅल्यूड असून गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे बाजारात मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल लागली आहे.

News18
News18
मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल-कॅप फंड मॅनेजरने इशारा दिला आहे की, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्स अजूनही प्रचंड महाग आहेत आणि त्यामध्ये आणखी घसरण होऊ शकते. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) शैलेश राज भान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, या सेगमेंटमधील दोन-तृतीयांश शेअर्स अजूनही जास्त किमतीचे आहेत आणि घसरण पूर्ण झालेली नाही.
घसरण सुरूच
गेल्या काही महिन्यांतील घसरणीनंतर बाजारात तेजी दिसून आली. परंतु ही रॅली फक्त लार्ज-कॅप शेअर्सपुरती मर्यादित राहिली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने आणि कमकुवत तिमाही निकालांमुळे लार्ज-कॅप शेअर्स घसरले. दुसरीकडे मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये घसरणीचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जास्त किमती आणि अपेक्षेपेक्षा कमी निकाल होय.
advertisement
Share Market घसरतोय पण 'या' व्यक्तीने एका महिन्यात कमावले 333 कोटी
भान यांच्या मते, गेल्या वर्षभरात या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर अनावश्यक पैसा गुंतवला गेला. त्यामुळे हे शेअर्स बबलसारखे फुगले. मात्र कंपन्यांचे प्रत्यक्ष निकाल अपेक्षेपेक्षा कमजोर आल्यानंतर मोठ्या घसरणीला सुरुवात झाली. ही घसरण पॅनिक सेलिंग (घबराट विक्री) नसून नैसर्गिक करेक्शन आहे, असेही ते म्हणाले.
advertisement
स्मॉल-कॅप शेअर्समध्ये गुंतवणुकीचा धोका अधिक
भान यांच्या मते, मिड-कॅप शेअर्सपैकी सुमारे 30-40% आता योग्य किमतीला पोहोचले आहेत आणि लार्ज-कॅप्समध्येही आवश्यक करेक्शन झाले आहे. मात्र स्मॉल-कॅप शेअर्स अजूनही जास्त किमतीचे आहेत. त्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करताना अधिक काळजी घ्यावी लागेल.
म्युच्युअल फंड गुंतवणूक स्थिर, पण...  
सध्या म्युच्युअल फंड गुंतवणूक स्थिर असून, गुंतवणूकदारांकडून पैसे काढण्याचा (रिडेम्प्शन) कोणताही दबाव नाही. त्यामुळे शेअर्सच्या किंमती हळूहळू कमी होतील, परंतु अचानक मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
गुंतवणूकदारांनी "अँकरिंग बायस" टाळावा
शैलेश भान यांनी गुंतवणूकदारांना "अँकरिंग बायस" टाळण्याचा सल्ला दिला आहे. अँकरिंग बायस म्हणजे जुनी उच्चतम किंमत लक्षात ठेवून शेअर्स खरेदी करणे, जरी ते आता ओव्हरप्राइस्ट असले तरीही. भान यांनी उदाहरण देताना सांगितले की, काही कंपन्यांचा तिमाही नफा फक्त 20 कोटी रुपये असताना त्यांची बाजारातील किंमत (मार्केट कॅप) 10,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. अशा कमकुवत कंपन्यांची बाजारातील किंमत 50-70% नी घसरू शकते.
advertisement
IPO मार्केटमध्येही सावधगिरी 
भान यांनी IPO बाजारालाही एक प्रकारचे बुलबुला (Bubble) असल्याचे सांगितले आणि गुंतवणूकदारांनी IPO मध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी, असे सुचवले.
मायक्रो-कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण
शैलेश भान यांनी मायक्रो-कॅप शेअर्सबाबतही सावध भूमिका घेतली. त्यांच्यानुसार,वज्या स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंड्स, विमा कंपन्या किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार रस घेत नाहीत, त्यामध्ये सर्वात मोठी घसरण (70% पर्यंत) दिसली आहे. तसेच ज्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड ऐवजी स्वतःच्या नावाने शेअर्स खरेदी केले, त्यांच्या पोर्टफोलिओला अधिक नुकसान सहन करावे लागले आहे. विशेषतः ज्या कंपन्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
सध्या मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्स ओव्हरवॅल्यूड असल्याने त्यामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे, असा इशारा निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडचे CIO शैलेश भान यांनी दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी आणि योग्य मूल्यमापन (Valuation) असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी आणि बाजारातील कृतींचे बारकाईने निरीक्षण करावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मराठी बातम्या/मनी/
Stock Market: शेअर बाजारात पैसे गुंतवणे म्हणजे आत्मघात; भूकंप नव्हे त्सुनामी येणार, फंड मॅनेजरने इशाऱ्याने झोप उडाली
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement