Share Market घसरतोय पण 'या' व्यक्तीने एका महिन्यात कमावले 333 कोटी; तुम्ही खरेदी करू शकता बजेटमधील Stock

Last Updated:

Share Market: एनसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ होत असून, फक्त एका महिन्यात 24% वाढ झाली आहे. या वाढीमुळे प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी तब्बल 333 कोटींचा नफा कमावला आहे.

News18
News18
मुंबई: अनेक महिन्यांच्या घसरणीच्या ट्रेंडनंतर भारतीय शेअर बाजारात थोडी तेजी आली आहे. यामुळे गुंतवणुकदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र शेअर बाजारात अस्थिरता असतानाही सरकारी कन्स्ट्रक्शन कंपनी एनसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. हा शेअर 6% पेक्षा जास्त वाढून 218.30 रुपयांवर पोहोचला. गेल्या एक महिन्यात या शेअरमध्ये 24% वाढ झाली आहे.
या वाढीमुळे प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांना तब्बल 333 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्याकडे एनसीसीचे 7.83 कोटी शेअर्स होते. कंपनीमध्ये त्यांचा हिस्सा 12.48% इतका आहे. शेअरच्या किमती वाढल्याने त्यांच्या गुंतवणुकीची एकूण किंमत 1,704 कोटी रुपयांवर गेली आहे. मागील महिन्यात ही किंमत 1,370 कोटी रुपये होती. म्हणजेच त्यांच्या संपत्तीत 333 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
advertisement
एनसीसी शेअरची कामगिरी
-28 फेब्रुवारी 2025 रोजी एनसीसी शेअरची किंमत 175 रुपये होती. जी आता 24% ने वाढली आहे.
-हा शेअर अद्यापही त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चतम 364.50 रुपयांपेक्षा 40% कमी आहे.
- याचा सर्वात कमी स्तर 169.95 रुपये आहे.
एनसीसीला 1,480 कोटींचा सरकारी ऑर्डर
अलीकडेच बिहार सरकारने एनसीसीला 1,480 कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प दिला आहे. हा प्रकल्प दरभंगा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पुनर्विकासाशी संबंधित आहे.
advertisement
कंपनीच्या आर्थिक कामगिरीची माहिती
- डिसेंबर 2024 तिमाहीत एनसीसीचा निव्वळ नफा 12.5% घटून 193.2 कोटी रुपये झाला.
- कंपनीचे उत्पन्न 1.6% वाढून 5,344.5 कोटी रुपये झाले.
- EBITDA (कंपनीचा ऑपरेटिंग नफा) 16.6% घसरून 420.9 कोटी रुपये झाला.
- मार्जिन 7.9% होते.
ब्रोकरेज फर्म्सचे मत
Antique Stock Broking ने एनसीसी शेअरचे टार्गेट 332 रुपये दिले आहे. तर IIFL Securities ने 287 रुपये आणि Nuvama Institutional Equities ने 282 रुपये दिले आहे. या सर्व फर्म्सनी हा शेअर खरेदी करा असा सल्ला दिला आहे. म्हणजेच भविष्यात हा शेअर वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
एनसीसी शेअरमध्ये गेल्या काही दिवसांत चांगली वाढ झाली असून भविष्यात तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो. रेखा झुनझुनवाला यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये मोठी कमाई केली आहे. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांनीही याकडे लक्ष ठेवायला हवे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Share Market घसरतोय पण 'या' व्यक्तीने एका महिन्यात कमावले 333 कोटी; तुम्ही खरेदी करू शकता बजेटमधील Stock
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement