धाराशिव : सध्याच्या घडीला अनेक जण नोकरी करत असताना व्यसायाकडे वळत आहेत. धाराशिवमधील विवेक देशमुख हे महावितरणमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत कपड्यांचा व्यवसाय करत आहेत. यामधून ते वर्षाला 50 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील विवेक तुळशीराम देशमुख हे महावितरणमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरी करीत आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते धाराशिव शहरात स्थलांतरित झाले आहेत. त्या ठिकाणी महावितरण कार्यालयात ते ऑपरेटर म्हणून काम करतायत. नोकरी करीत असताना स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा आपणही व्यवसाय करावा त्यातून चांगलं उत्पन्न मिळवावंही त्यांची इच्छा होती. एके दिवशी त्यांनी मुलाला कपडे खरेदीसाठी एका कापड दुकानाला भेट दिली आणि कापड दुकानाच्या व्यवसायाची माहिती घेतली. व्यवसायातले बारकावे शिकून घेतले. व्यवसाय कसा करावा याची माहीती घेतली.
advertisement
नोकरीत मन रमत नव्हतं, YouTube वर Video पाहिले अन् बनला मुंबईच गोल्डन मॅन!
आठ वर्षांपूर्वी त्यांनी कापड व्यवसायासाठी त्यांनी 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून कपड्याच्या दुकानाची सुरुवात केली. आता नोकरी करीत ते कापड व्यवसाय सांभाळत आहेत. वर्षाकाठी त्यांना 50 लाख रुपयांची उलाढाल होतेय. धाराशिव शहरात मुख्य पेठेत त्यांचे कपड्यांचे दुकान आहे. कपड्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी दोन तरुणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
खरंतर नोकरी करुन व्यवसाय करणारे व्यवसायिक अत्यंत कमी आहेत तर महावितरणमध्ये ऑपरेटर पदाची नोकरी करुन व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे. त्यातुन त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. खरंतर एकीकडे नोकरी करत असताना काहीतरी व्यवसाय करायला हवा हे त्यांनी दाखवून दिले आणि हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.