कोणत्याही पॉलिसीसाठी डेथ क्लेम करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवा की LIC विम्याची डेथ क्लेमची प्रक्रिया केवळ ऑफलाइन पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला प्रथम एलआयसीच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. यासोबतच या सर्व कागदपत्रांवर विमा एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसरची सही आवश्यक असेल.
Ration Card काढायचंय का? जाणून घ्या नवीन कार्ड बनवण्याची प्रोसेस
advertisement
कोणती कागदपत्रे लागतील?
> पॉलिसी धारकाचे मृत्यू प्रमाणपत्र>> पॉलिसी बाँड
>> नॉमिनीचे आधार आणि पॅन कार्ड
>> डेथ क्लेम फॉर्मवर विमा एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसरची सही
>> नॉमिनीला पासबुक किंवा त्याच्या बँक खात्याचा कॅन्सल चेक द्यावा लागेल.
Gold ओव्हरड्राफ्ट लोन घ्यायचंय? फॉलो करा ही सोपी ट्रिक, झटपट मिळेल Loan
LIC डेथ क्लेम कसा दाखल करावा?
विमा पॉलिसीसाठी डेथ क्लेम दाखल करण्यासाठी, तुम्ही प्रथम पॉलिसीधारकाच्या होम ब्रान्चला भेट दिली पाहिजे. तेथे तुमच्या नातेवाईकाच्या मृत्यूची माहिती द्या आणि फॉर्म 3783, 3801 आणि एनईएफटी फॉर्म भरा. त्यानंतर वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जमा करा. यासह, एक इंटिमेशन लेटर सादर करा. यामध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूशी संबंधित सर्व माहिती नोंदवली जाईल. यासोबतच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक NEFT फॉर्ममध्ये सबमिट करा. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तुम्हाला पावती स्लिप मिळेल जी तुमच्याकडे ठेवावी. 10 ते 15 दिवसात तुमच्या खात्यात क्लेमचे पैसे जमा होतील.