8 कोटींपेक्षा अधिक सदस्यांसाठी हा बदल महत्त्वाचा असणार आहे. Infosys, Wipro आणि TCS सारख्या अग्रगण्य IT कंपन्यांच्या मदतीने हा प्लॅटफॉर्म उभारला जात आहे. सुरुवातीला जून 2025 मध्ये याचे लोकार्पण करण्याचा विचार होता, मात्र तांत्रिक तपासण्या पूर्ण करण्यासाठी काही महिने हे पुढे ढकलण्यात आलं.
ATM आणि UPI द्वारे तत्काळ पैसे
EPFO 3.0 चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ATM मधून थेट PF रक्कम काढता येणार ही सुविधा. सदस्यांनी आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करणे आणि आधार-बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे. यामुळे आकस्मिक परिस्थितीत त्वरित रोकड मिळू शकेल. तसेच देशातील डिजिटल पेमेंट क्रांतीशी सुसंगत राहण्यासाठी UPI द्वारेही PF काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
advertisement
ऑनलाइन क्लेम आणि अपडेट्स सोपे होणार
आता छोट्या दुरुस्त्या किंवा क्लेम अपडेटसाठी EPFO कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. OTP व्हेरिफिकेशनद्वारे घरबसल्या सुधारणा करता येतील आणि क्लेमची स्थिती मोबाईलवर ट्रॅक करता येईल. यामुळे प्रक्रिया वेगवान होणार असून सदस्यांचा वेळ आणि त्रास दोन्ही कमी होणार आहे.
लोकांचं लक्ष सोन्यावर पण चांदीने मारली बाजी, आतापर्यंतचे मोडले सगळे रेकॉर्ड
मृत्यू क्लेम प्रक्रियेत दिलासा
कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर आर्थिक मदतीसाठी लागणारी कागदपत्रे अनेकदा कुटुंबाच्या वेदनेत भर घालत होती. EPFO 3.0 मध्ये नाबालिग वारसांसाठी अभिभावक प्रमाणपत्र अनिवार्य नसेल, त्यामुळे कुटुंबांना मदत लवकर मिळू शकेल.
मोबाईलवर PF ची माहिती मिळणार
हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे मोबाईल-फ्रेंडली आहे. कधीही, कुठेही आपली बचत, क्लेम आणि खात्याची माहिती पाहता येईल. EPFO च्या या पावलामुळे लाखो कर्मचाऱ्यांसाठी PF खाते हा केवळ निवृत्ती निधी न राहता, आपत्कालीन प्रसंगी विश्वासार्ह बँकिंग पर्याय बनेल. अनेकांसाठी हा बदल म्हणजे सुरक्षिततेची नवी हमी आणि तंत्रज्ञानाने जीवन कसे सोपे होते याचे जिवंत उदाहरण ठरणार आहे.
नोकरी करणाऱ्या लाखो कुटुंबांसाठी भविष्य निधी म्हणजेच PF खाते हा एक सुरक्षिततेचा आधार आहे. आपत्कालीन प्रसंगी याच खात्यातील बचत पहिला आधार ठरते. पण आतापर्यंत या रकमेवर हात घालण्यासाठी लागणाऱ्या कागदोपत्री प्रक्रियेमुळे अनेकदा लोकांना अडचणींना सामोरे जावे लागायचे. कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहे.